नवी दिल्ली - भाजपने (BJP) पश्चिम बंगाल विधानभा निवडणुकीसाठी (West Bengal Election) शनिवार (6 मार्च) पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याकरिता एकूण 57 उमेदवारांची यादी जाहीर केली. महत्वाचे म्हणजे नंदीग्राममधून शुभेंदू अधिकारी यांना तिकिट देण्यात आले आहे. त्यामुळे आता येथे ममता आणि शुभेंदू अधिकारी (Mamata Banerjee vs Suvendu Adhikari) यांच्यात थेट सामना रंगणार आहे. (West bengal assembly election bjp candidate list decleard Mamata Banerjee vs Suvendu Adhikari in Nandigram)भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी दिल्ली येथील पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. अरुण सिंह म्हणाले, केंद्रीय सूचना समितीने 57 जागांसाठी उमेदवारांच्या नावावर मोहर लावली आहे. नंदीग्राममधून शुभेंदू अधिकारी यांना तिकिट देण्यात आले आहे. त्यामुळे शुबेंदू आता नंदीग्राम येथून ममतांविरोधात निवडणूक लढतील हे निश्चित झाले आहे. याच बरोबर क्रिकेटर अशोक डिंडालाही तिकीट देण्यात आले आहे.
ममतांना जबर धक्का, TMC मध्ये उभी फूट! तब्बल 10 आमदारांसह तीन खासदार भाजपच्या संपर्कात?
'बंगालमध्ये हिंसाचाराने जनता त्रस्त, आता होतेय खरे परिवर्तन', भाजपत प्रवेश करताच त्रिवेदींचा ममतांवर हल्लाबोलगालमध्ये कुठल्या टप्प्यात किती जागांसाठी मतदान -पश्चिम बंगालमधील 294 पैकी 30 जागांवर 27 मार्चला पहिल्या टप्प्यात मतदान होईल, दुसऱ्या टप्प्यात 30 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 31 जागांसाठी, 6 एप्रिलला चौथ्या टप्प्यात 44 जागांसाठी 10 एप्रिलला पाचव्या टप्प्यात 45 जागांसाठी 17 एप्रिलला, सहाव्या टप्प्यात 43 जागांसाठी 22 एप्रिलला, सातव्या टप्प्यात 36 जागांसाठी 26 एप्रिलला तर आठव्या टप्प्यात 35 जागांसाठी 29 एप्रिलला मतदान होईल. तर निकाल 2 मेरोजी लागणार आहे.