कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा (west bengal assembly election 2021) निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान शनिवारी होत असून, या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस पक्षाने केलेले एक सर्व्हेक्षण समोर आले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या लोकप्रियतेमुळे तृणमूल काँग्रेसचा पराभव निश्चित असल्याचे म्हटले जात आहे. क्लब हाऊस या अॅपच्या चॅटरूममध्ये झालेल्या या गुप्त संभाषणाची माहिती बाहेर फुटली असल्याचा दावा भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे. (bjp leader amit malviya claims that prashant kishor chats get public)
अमित मालवीय यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये मालवीय यांनी दावा केला आहे की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचे रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी क्लब हाऊस या अॅपवर झालेल्या गुप्त बैठकीत पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाची दाट शक्यता असून, तृणमूल काँग्रेसच्या विरोधात मतदान होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. दलित समाजाची मते भाजपला मिळतील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा भाजपला चांगला फायदा होईल, असेही प्रशांत किशोर यांनी मान्य केले असल्याचा दावा मालवीय यांनी केला आहे.
गुप्त बैठकीतील चर्चा सार्वजनिक?
क्लब हाऊस या अॅपवर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या एका कॉन्फरन्समधील गुप्त संभाषण बाहेर फुटल्याचा दावा अमित मालवीय यांनी केला आहे. क्लब हाऊस या अॅपवर प्रशांत किशोर आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्ते, नेत्यांची बैठक सुरू होती. मात्र, या अॅपवरील संभाषण वा त्यावर होत असलेली चर्चा अन्य युझर्सना समजत आहे, याची कल्पना सदस्यांना नव्हती. प्रशांत किशोर आणि अन्य उपस्थितांमध्ये नेमकं काय बोलणे सुरू आहे, हे केवळ पत्रकार नाही, तर त्या अॅपवर असलेल्या अन्य युझर्सना समजत होते. या अॅपवरील चर्चा अन्य युझर्सना समजत असल्याची जाणीव प्रशांत किशोर यांना झाली, तेव्हा चर्चा एकदम थांबली, असा दावा अमित मालवीय यांनी केला आहे.
परीक्षा पे चर्चा: सोशल मीडियावर खिल्ली आणि टोलेबाजी; अखेर ‘ते’ ट्विट मागे
ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदारसंघात हरणार?
अमित मालवीय यांच्या या दाव्यामुळे तृणमूल काँग्रेसची चिंता आणखी वाढली असून, काही दिवसांपूर्वीच दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधीही भाजपने असाच दावा केला होता. ममता बॅनर्जींसाठी काम करणारे निवडणूक रणनीती तज्ज्ञ प्रशांत किशोर यांचा दाखला देत ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदारसंघात हरणार असल्याचे भाजपने म्हटले होते. मात्र, तृणमूल काँग्रेसने हे सर्व दावे फेटाळून लावले होते.
परवानगी नसताना अमेरिकन युद्धनौकेची भारतीय समुद्रात घुसखोरी; MEA कडून गंभीर दखल
प्रशांत किशोर यांच्या संभाषणाचा दाखला
अमित मालवीय यांनी प्रशांत किशोर यांच्या संभाषणाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचे म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये ध्रुवीकरणाची भाजपची चाल यशस्वी ठरली आहे. पश्चिम बंगालच्या लोकसंख्येत साधारण २७ टक्के मतदार असलेल्या अनुसूचित जातीचे लोक आणि मतुआ मतदार हे भाजपला मतदान करतील. काँग्रेस, डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेसने गेल्या 20 वर्षात मुस्लिमांचे तुष्टीकरण केले, अशी कबुलीही तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक तज्ज्ञाने दिल्याचा दावा मालवीय यांनी केला आहे.