ममता बॅनर्जी यांनी आपला मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक करावा: अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 06:51 PM2021-03-23T18:51:30+5:302021-03-23T18:53:30+5:30
west bengal assembly election 2021: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah) यांनी मेदिनीपूर येथे रोड शो केला.
मेदिनीपूर : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (west bengal assembly election 2021) पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता थोडे दिवस राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रचारसभांना चांगलाच वेग आला आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. भाजपने संकल्पपत्रही जाहीर केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah) यांनी मेदिनीपूर येथे रोड शो केला. ममता बॅनर्जी यांनी आपला मेडिकर रिपोर्ट सार्वजनिक करावा, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. (west bengal assembly election 2021 bjp leader amit shah demands that mamata banerjee public her medical report)
पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर येथील रोड शो दरम्यान एका वाहिनीशी बोलताना अमित शाह यांनी ही मागणी केली आहे. ते पुढे म्हणाले की, बंगाली जनतेच्या इच्छेनुसारच संकल्पपत्र तयार करण्यात आले आहे. भाजपचे संकल्पपत्र संपूर्ण देशात गांभीर्याने घेतले जाते. सोनार बांगलाची संकल्पना घेऊनच आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत, असे अमित शाह यांनी नमूद केले.
“हे काही गंभीर आरोप नाहीत”; नवनीत राणांवर संजय राऊतांचा पलटवार
सोनार बांगलाचे संकल्पपत्र
बंगाली जनतेला घुसखोरी मुक्त राज्य करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच भ्रष्टाचार मुक्त प्रशासनही देण्याचे वचन आम्ही जनतेला दिले आहे, असे सांगत पश्चिम बंगालमधील जनता परिवर्तनासाठी तयार असून, २०० पेक्षा जास्त जागा भाजपला मिळतील, असा दावा अमित शाह यांनी यावेळी बोलताना केला आहे.
सीएएची अंमलबजावणी करणार
पश्चिम बंगालसह संपूर्ण देशभरात असलेल्या शरणार्थींना नागरिकत्व देण्याबाबत आमचे धोरण स्पष्ट आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी पश्चिम बंगालमध्येही केली जाईल. कोट्यवधी शरणार्थींना भाजप सन्मान मिळवून देईल, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले. तसेच बंगालचा पुत्रच पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री होईल, अशी ग्वाही अमित शाह यांनी दिली.
NRC ची अंमलबजावणी, ३० लाख कुटुंबांना आर्थिक मदत; आसामसाठी भाजपचे संकल्पपत्र
मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक करावा
ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या पायाला झालेल्या दुखापतीला भाजप जबाबदार असल्याचे म्हटले आहे. यावर बोलताना अमित शाह म्हणाले की, ममता बॅनर्जींना इतकंच वाटत असेल, तर त्यांनी आपला मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक केला पाहिजे.
दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी आठ टप्प्यात मतदान होणार आहे. २७ मार्च रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार असून, २ मे रोजी पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकींची मतमोजणी केली जाणार आहे.