साडी नव्हे, बरमुडा घाला; ममता बॅनर्जींवर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 07:47 PM2021-03-24T19:47:25+5:302021-03-24T19:50:20+5:30
west bengal assembly election 2021: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली.
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचा (west bengal assembly election 2021) पहिला टप्पा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, प्रचाराला वेग आला आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप (BJP) एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र, आता एकमेकांवर आरोप करताना नेते मंडळी वादग्रस्त विधाने करायला लागल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली. ममता बॅनर्जी यांनी साडी नाही, तर बरमुडा घालावा, असे विधान भाजप नेत्याने केले आहे. (west bengal assembly election 2021 bjp leader dilip ghosh made disputed statement on mamata banerjee)
भाजपचे पश्चिम बंगालमधील प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी एका प्रचारसभेला संबोधित करताना खालच्या पातळीवर जाऊन विधाने केली. यानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी एका प्रचारसभेनंतर ममता बॅनर्जी यांच्या पायाला मार लागला होता. तेव्हापासून ममता बॅनर्जी व्हिलचेअरवरून प्रचार करत आहेत. यावरून दिलीप घोष यांनी आक्षेपार्ह विधान केले आहे.
सत्तेत येण्यासाठी काँग्रेस कोणाशीही युती करू शकतो; पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र
काय म्हणाले दिलीप घोष
प्लास्टर कापलेले आहे. क्रॅप बँडेज बांधलेले आणि पाय वर करून सर्वांना दाखवत आहेत. साडी परिधान केलेली आहे. एका पाय उघडा आणि एक पाय झाकलेला आहे. अशा प्रकारची साडी नेसलेले कधीच कुणाला पाहिलेले नाही. तर मग बरमुडा का परिधान केला नाही, असे धक्कादायक विधान दिलीप घोष यांनी केले आहे.
या माकडांना वाटते ते बंगाल जिंकतील?
टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ट्विट करून दिलीप घोष यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. भाजपच्या पश्चिम बंगालच्या अध्यक्षांनी सार्वजनिक सभेत आपला पाय दाखवण्यासाठी बरमुडा शॉर्ट परिधान केला पाहिजे, असे घोष यांनी म्हटले आहे आणि या माकडांना वाटते आहे की, ते बंगालमध्ये जिंकतील? अशी विचारणा महुआ मोईत्रा यांनी केली आहे.
“आता तोंड उघडायला भाग पाडू नका, १०० कोटींची वसुली...”; ज्योतिरादित्य शिंदे कडाडले
ममता दीदींनी मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक करावा
ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या पायाला झालेल्या दुखापतीला भाजप जबाबदार असल्याचे म्हटले आहे. यावर बोलताना अमित शाह म्हणाले की, ममता बॅनर्जींना इतकंच वाटत असेल, तर त्यांनी आपला मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक केला पाहिजे. दरम्यान, श्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी आठ टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान काही दिवसांवर असून, २ मे रोजी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी केली जाणार आहे.