West Bengal Election 2021: २०० जागा विसरा, भाजपला मोठा रसगुल्ला मिळेल; ममता दीदींचा अमित शाहांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 02:07 PM2021-03-29T14:07:58+5:302021-03-29T14:10:53+5:30

west bengal assembly election 2021: ममता बॅनर्जी यांनी अमित शाह यांना प्रत्युत्तर दिले आहे.

west bengal assembly election 2021 mamata banerjee says bjp will get big rosogolla | West Bengal Election 2021: २०० जागा विसरा, भाजपला मोठा रसगुल्ला मिळेल; ममता दीदींचा अमित शाहांना टोला

West Bengal Election 2021: २०० जागा विसरा, भाजपला मोठा रसगुल्ला मिळेल; ममता दीदींचा अमित शाहांना टोला

Next
ठळक मुद्देममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोलअमित शाहांना दिले प्रत्युत्तरभाजपला मोठा रसगुल्ला मिळेल - ममता बॅनर्जी

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (west bengal assembly election 2021) पहिल्या टप्प्यात भरघोस मतदान झाल्याचे पाहायला मिळले. पश्चिम बंगालमध्ये ज्या ३० मतदारसंघांत ७९.७९ टक्के मतदान झाले. यानंतर पुन्हा एकदा प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसने ही निवडणूक खूपच प्रतिष्ठेची केल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपला २०० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. यावर ममता बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर दिले असून, भाजपला मोठा रसगुल्ला मिळेल, असा टोला लगावला आहे. (west bengal assembly election 2021 mamata banerjee says bjp will get big rosogolla)

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बंगालमध्ये भाजप २०० पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा शाह यांनी केला. शाह यांच्या या दाव्यावरून ममता बॅनर्जी यांनी शाह यांना टोला लगावला आहे. चंदीपूर येथील एका प्रचारसभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

कोरोनाचे थैमान! केंद्र आणि राज्य सरकारने मुंबईसाठी एकत्र यायला हवे; काँग्रेसचा सल्ला

भाजपला मोठा रसगुल्ला मिळेल

भाजप सर्व जागा जिंकणार असल्याचा दावा का करत नाही. बाकीच्या जागा काय काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षासाठी सोडल्या आहेत का, अशी विचारणा करत या निवडणुकीत भाजपला मोठा रसगुल्लाच मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर लगेच भाजप असे दावे का करत आहे, हे समजत नाही. केंद्रीय संस्थांनी उर्वरित टप्प्यातील मतदान होईपर्यंत तटस्थपणे कामे करावीत. लोकांना भाजपला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करून नये, असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी केला. 

दरम्यान, पाच राज्यात विधानसभा निवडणुका होत असल्या, तरी सर्वांत जास्त चर्चा पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची सुरू आहे. पश्चिम बंगालसह आसाम विधानसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्पातील मतदान शनिवारी पार पडले.  आसाममध्ये पहिल्या टप्प्यात ४७ जागांसाठी ७७ टक्के मतदान झाले. दोन्ही ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

Web Title: west bengal assembly election 2021 mamata banerjee says bjp will get big rosogolla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.