दीदी, ओ दीदी... तुमच्या पापांचा घडा भरलाय, आता जनताच शिक्षा देईल: PM मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 02:30 PM2021-03-24T14:30:53+5:302021-03-24T14:34:34+5:30
west bengal assembly election 2021: शुभेंदू अधिकारी यांचे वडील शिशिर अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचा (west bengal assembly election 2021) पहिला टप्पा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना प्रचाराला वेग आला आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून, कांथी येथे जनसभेला संबोधित केले. यावेळी शुभेंदू अधिकारी यांचे वडील शिशिर अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधाननरेंद्र मोदींनी यावेळी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. (west bengal assembly election 2021 pm narendra modi criticised mamata banerjee over various issue)
जे तरुण प्रथम मतदान करणार आहेत, त्यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. बंगालमध्ये आता खऱ्या अर्थाने परिवर्तनाची गरज आहे आणि ते केवळ भाजपच करू शकते, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. बंगालमधील अगदी लहान मुलांनाही ममता बॅनर्जी यांच्या राजकारणातील खेळाची माहिती आहे. २ मे रोजी सर्वांसमोर ही बाब उघड होईल, असेही पंतप्रधान म्हणाले.
Didi hasn't been able to answer those who were first destroyed by Amphan & later by 'tolabaaz' of TMC. The relief sent to Bengal by Centre got stuck in the 'Bhaipo window'. Didi, Bengal wants to know who looted the relief for Amphan?: PM Modi in Contai#WestBengalElections2021pic.twitter.com/tdHb78hrqh
— ANI (@ANI) March 24, 2021
तृणमूल काँग्रेसच्या पापांचा घडा भरलाय
तृणमूल काँग्रेसच्या पापांचा घडा भरलाय. ममता दीदी यांच्या कुशासनाची शिक्षा आता जनताच देईल, अशी टीका मोदी यांनी केली. संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात पश्चिम बंगालचे विशेष महत्त्व आहे. बंगालच्या योगदानाला पुढील पीढीपर्यंत पोहोचवण्याचे काम भाजप करेल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदींनी दिली आहे.
एन. व्ही. रमण होणार नवे सरन्यायाधीश; न्या. बोबडे यांनी केली केंद्राला शिफारस
ममता दीदींवर हल्लाबोल
ममता दीदी मेदिनीपूर येथे जाण्याचे निमित्त शोधत असतात. मात्र, जनतेच्या प्रश्नांची ममता दीदींकडे उत्तरे नाहीत. तृणमूल काँग्रेसमुक्त पश्चिम बंगाल व्हावा, असा आवाज आता प्रत्येक घरातून येऊ लागला आहे. बंगाली जनतेने आता परिवर्तनाचे मन बनवले आहे, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला.
दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी आठ टप्प्यात मतदान होणार आहे. २७ मार्च रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार असून, २ मे रोजी पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकींची मतमोजणी केली जाणार आहे.