दार्जिलिंग: पश्चिम बंगाल विधानसभा (west bengal assembly election 2021) निवडणुकींच्या पाचव्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग आला आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. सुरुवातीच्या चार टप्प्यांनंतर आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी प्रचारसभांना हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. दार्जिलिंग येथे आयोजित रॅलीत बोलताना राहुल गांधी यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. (rahul gandhi criticised bjp over sonar bangla)
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपसह पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसवरही टीका केली आहे. पश्चिम बंगालचे विभाजन करून येथील संस्कृती नष्ट करण्याचा भाजपचा डाव आहे. आसाम आणि तामिळनाडूमध्ये भाजपने हेच केले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
Break The Chain: ठाकरे सरकार व केंद्रातील मोदी सरकारच्या पॅकेजमधील फरक आणि साम्य काय? पाहा, डिटेल्स
भाजप द्वेष आणि हिंसा पसरवतंय
द्वेष आणि हिंसेशिवाय भाजपकडे देण्यासारखे काहीच नाही. या गोष्टी पसरवण्याचे काम भाजप करत आहे, असा घणाघातही राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केला. तसेच पश्चिम बंगालमध्ये भाजप सोनार बांगलाच्या गोष्टी करत आहेत. मात्र, संपूर्ण देशाची वाट लावून ठेवली आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. तर, पश्चिम बंगाल असे एकमेव राज्य आहे, जिथे नोकऱ्यांसाठी कटमनी द्यावं लागतं, असा दावाही राहुल गांधी यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका करताना केला.
भाजप आणि RSS घृणा पसरवतात
आसाममधील जनता संस्कृती आणि इतिहासावर हल्ला होत असल्याचे सांगितले जात आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS जिथे जाईल, तिथे घृणा आणि द्वेष पसरवण्याचे काम करतात, असा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.
गुजरात: कोरोना बचावासाठी सरकारी रुग्णालयात यज्ञ; पण, अंतिम संस्काराची व्यवस्था अपुरी
दरम्यान, भाजपला विधानसभा निवडणुकीत ७० जागाही मिळणार नाहीत, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. भाजप एकाच मुद्द्यावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भाष्य करत खोटे बोलत आहे. तृणमूल पुन्हा सत्तेत आल्यास पश्चिम बंगालमध्ये वादग्रस्त राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी) लागू होऊ देणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.