West Bengal Assembly Elections 2021 : मोदींना विमानतळावरच 'जादू की झप्पी' देणारे करीमुल हक कोण?, घ्या जाणून
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 02:42 PM2021-04-10T14:42:16+5:302021-04-10T14:49:12+5:30
करीमुल हक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतल्यानंतर त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मोदींना जादू की झप्पी देणारे करीमुल हक नेमके आहेत कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा (west bengal assembly election 2021) निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान शनिवारी होत असून राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच आयोजनही करण्यात आलंय. त्यासाठी, नरेंद्र मोदींनी आज जलपाईगुडी येथे पोहोचले. तत्पूर्वी विमानतळावर मोदींच्या स्वागतासाठी पद्म पुरस्कार विजेते करीमुल हक यांनी मोदींची गळाभेट घेतली. करिमुल हक यांनी पश्चिम बंगालमध्ये बाईक अॅम्बुलन्स दादा या नावानेही ओळखले जाते.
करीमुल हक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतल्यानंतर त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मोदींना जादू की झप्पी देणारे करीमुल हक नेमके आहेत कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. करीमुल हक हे गोरगरीब रुग्णांसाठी मोठा आधारवड आहेत. गरीब रुग्णांच्या उपचारासाठी ते आपली दुचाकी घेऊन त्यांच्या घरापर्यंत जातात. विशेष म्हणजे या रुग्णांवर ते मोफत उपचार करतात. आत्तापर्यंत करिमुल दादांनी जवळपास 4000 रुग्णांचे जीव वाचवले आहेत.
हक हे चहाच्या बगीचामध्ये काम करणाऱ्या हक दादांनी ग्रामीण भागातील रुग्णसेवेसाठी आपलं जीवन वाहून घेतलंय. गाव-खेड्यातील गरजूंना उपचारातून बरं करण्यासाठी ते दिवसरात्र मेहनत घेतात. त्यांच्या याच समाजसेवी कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या हक यांच्या जीवनावर पुस्तक लिहिण्यात आलंय. ‘बाइक एम्बुलेंस दादा, द इंस्पायरिंग स्टोरी ऑफ करीमुल हक: द मैन हू सेव्ड 4000 लाइव्स’ या नावाने त्यांचे पुस्तक जीवनचरित्राच्या रुपाने प्रकाशित झाले आहे.
पत्रकार बिस्वजीत झा यांनी हे पुस्तक लिहिले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा करीमुल दादांच्या भागात असल्याने त्यांना विशेष आमंत्रण देण्यात आले होते. त्यावेळी, विमानतळावर पोहोचताच, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिठी मारुन त्यांचे स्वागत केले.
West Bengal: Padma awardee Karimul Haque, also known as 'Bike Ambulance Dada' met PM Modi upon his arrival at Bagdogra Airport, today
— ANI (@ANI) April 10, 2021
Haque was awarded Padma award for his unique way of social service by ferrying patients to medical facilities on his motorbike in Jalpaiguri Dist pic.twitter.com/nFj8YKCPID
सर्वेक्षणात भाजपच वरचढ
तृणमूल काँग्रेस पक्षाने केलेले एक सर्व्हेक्षण समोर आले आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या लोकप्रियतेमुळे तृणमूल काँग्रेसचा पराभव निश्चित असल्याचे म्हटले जात आहे. पश्चिम बंगालच्या क्लब हाऊसमध्ये झालेल्या या गुप्त संभाषणाची माहिती बाहेर फुटली असल्याचा दावा भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे. (bjp leader amit malviya claims that prashant kishor chats get public)