ममतांची व्हीलचेअरवरून रॅली; म्हणाल्या, 'लोकांच्या वेदना माझ्या वेदनांपेक्षा जास्त' 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 06:54 PM2021-03-15T18:54:24+5:302021-03-15T18:58:17+5:30

West Bengal Assembly Elections 2021: भाजपा खोटे बोलून जिंकली आहे, ते सर्व काही विकत आहेत, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला.

West Bengal Assembly Elections 2021: Mamata Banerjee addressed a rally in Purulia targets BJP | ममतांची व्हीलचेअरवरून रॅली; म्हणाल्या, 'लोकांच्या वेदना माझ्या वेदनांपेक्षा जास्त' 

ममतांची व्हीलचेअरवरून रॅली; म्हणाल्या, 'लोकांच्या वेदना माझ्या वेदनांपेक्षा जास्त' 

googlenewsNext
ठळक मुद्देपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारपासून व्हीलचेअरवरून आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे.

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी (West bengal Assembly Election 2021) अजून काही दिवस शिल्लक आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारपासून व्हीलचेअरवरून आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात नंदीग्राममध्ये प्रचार सभेदरम्यान ममता बॅनर्जी या धक्का लागल्यामुळे जखमी झाल्या आहेत. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी आज पुरुलियामध्ये जवळपास ३०० किलोमीटरची रॅली काढली. यावेळी त्यांनी स्वत: जखमी असल्याचा उल्लेख करत भाजपावर निशाणा साधला आहे. (West Bengal Assembly Elections 2021: Mamata Banerjee addressed a rally in Purulia targets BJP)

"लोकांच्या वेदना माझ्या वेदनांपेक्षा जास्त आहेत. मी अपघातात जखमी झाले. मी वाचले हे माझे नशीब आहे. मला प्लॅस्टर लावण्यात आले असून मी चालू शकत नाही. काही लोकांचा असा विचार होता की, मी तुटलेल्या पायाने बाहेर पडू शकणार नाही," असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. याचबरोबर, याठिकाणी भाजपा खोटे बोलून जिंकली आहे, ते सर्व काही विकत आहेत, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला. दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने याठिकाणी विजय मिळविला होता.

"आम्ही विकास करण्यासाठी गुंतलो आहोत आणि भाजपा इंधन आणि स्वयंपाक गॅसच्या किंमती वाढवत आहे, रॉकेलही नाही," असे सांगत ममता बॅनर्जी यांनी इंधनाच्या वाढत्या किंमतीवरून केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. तसेच, त्या म्हणाल्या,"आमच्या सरकारने विधवांसाठी एक हजार रुपये पेन्शन जाहीर केली आहे. आमच्या सरकारने 'दुआरे'च्या (दारात) अंतर्गत शासकीय जात प्रमाणपत्रे वाटली आहेत. आम्ही रघुनाथ मुर्मू परिसरही बांधला आहे.''

दरम्यान, गेल्या बुधवारी नंदीग्राम येथून निवडणूक फॉर्म भरल्यानंतर ममता बॅनर्जी येथील बाजारातील लोकांना अभिवादन करण्यासाठी गाडीच्या फूटबोर्डवर उभ्या होत्या. त्यावेळी धक्का लागल्यामुळे त्याच्या पायाला दुखापत झाली. या घटनेनंतर ममता बॅनर्जी आणि त्यांची पार्टी तृणमूल काँग्रेसमधील नेत्यांनी भाजपावर निशाणा साधला. 

भाजपाकडून हल्लाच करण्यात आल्याचे तृणमूल काँग्रेसकडून सांगण्यात येत होते. यानंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेतली आणि चौकशी केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, हा हल्ला नसून अपघात आहे. गेल्या शुक्रवारी अहवाल मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाने यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. यावेळी ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षा कर्मचार्‍यांच्या चुकीमुळे हा अपघात घडल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

(ममतांवर कुठलाही हल्ला नाही, निवडणूक आयोगाचा निर्वाळा)

Web Title: West Bengal Assembly Elections 2021: Mamata Banerjee addressed a rally in Purulia targets BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.