शहरं
Join us  
Trending Stories
1
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
5
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
7
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
8
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
9
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
11
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
12
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
13
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
15
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
16
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
17
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
18
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
19
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन

West Bengal Assembly Elections 2021: सुरक्षा यंत्रणांवरील आरोपांमुळे ममता अडचणीत; निवडणूक आयोगाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 6:26 AM

गृहमंत्री शहा यांचेदेखील टीकास्त्र

कोलकाता : निवडणूक कर्तव्यावर असलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाविरोधात केलेल्या आरोपांमुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अडचणीत आल्या आहेत. निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना नोटीस बजावली आहे. ममता यांच्या निराधार, तथ्यहीन वक्तव्यांमुळे केंद्रीय सुरक्षा दलाचे मनोबल घटले आहे. हा जवानांचाच अपमान करण्याचा प्रयत्न आहे, अशी भूमिका आयोगाने मांडली आहे. दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी आपण आरोपांवर कायम असल्याचे म्हटले असून, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.  केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे जवान लोकांना मतदान केंद्रापासून जाण्यापासून थांबवत आहेत. शिवाय महिलांशी असभ्य वागणूक करीत असून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार भाजपला मदत करीत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. आयोगाने ही बाब गंभीरतेने घेतली आहे. यासंदर्भात त्यांना नोटीस बजाविण्यात आली असून, शनिवार ११ वाजेपर्यंत स्पष्टीकरण मागितले आहे. असे वक्तव्य करून ममता बॅनर्जी यांनी भारतीय दंड विधानाच्या अनेक कलमांचे उल्लंघन केले आहे. बॅनर्जी यांनी केंद्रीय दलाच्या जवानांवर आरोप करताना महिला मतदारांना भडकविण्याचा प्रयत्न केला आहे, हे दुर्दैवी आहे, असे नोटिशीत म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाची ही दुसरी नोटीस आहे. केंद्रीय सुरक्षा दलांवर ममतांनी केलेल्या आरोपांवर गृहमंत्री शहा यांनीदेखील भाष्य केले आहे. निवडणुकीत पराभव दिसून येत असल्याने ममता निराश झाल्या आहेत. ममता बंगालमध्ये अराजकता आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवडणुकीच्या कालावधीत सुरक्षायंत्रणा आयोगाच्या निर्देशानुसार काम करतात याची जाणीव असायला हवी, असे शहा म्हणाले. ...तोपर्यंत हस्तक्षेपाबाबत बोलत राहील निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी परत आक्रमक पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत भाजपसाठी काम करणे बंद करीत नाही तोपर्यंत सीआरपीएफच्या हस्तक्षेपाबाबत बोलत राहील. पंतप्रधान मतदानाच्या काळात परीक्षा पे चर्चाच्या माध्यमातून प्रचार करतात. ती बाब आयोगाला दिसत नाही का, असा प्रश्न ममता यांनी उपस्थित केला.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाAmit Shahअमित शहा