शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पश्चिम बंगाल: हिंसाचारावर भाजप खासदाराचा संताप; म्हणाले, "लक्षात ठेवा तृणमूलच्या खासदारांना, मुख्यमंत्र्यांना..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 10:53 AM

West Bengal : केंद्रीय गृह मंत्रालयानं घेतली दखल, अहवाल सोपवण्याचे राज्याला निर्देश

ठळक मुद्देकेंद्रीय गृह मंत्रालयानं घेतली दखलअहवाल सोपवण्याचे राज्याला निर्देश

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी राजकीय पक्ष आणि असामाजिक घटक यांच्यात हिंसाचाराच्या बर्‍याच बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर आणि निकाल जाहीर झाल्यानंतरही राज्यात हिंसाचार होत असल्याचं समोर आलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) लोकांकडून हा हिंसाचार सुरू असल्याचा आरोप भाजपचे खासदार परवेश साहिब सिंह वर्मा यांनी केला आहे. "तृणमूल काँग्रेसच्या विजयांनंतर पक्षाच्या गुंडांनी भाजपा कार्यकर्त्यांना मारहाण केली," असं ते म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी तृणमूल कांग्रेसला इशारा देत तुमच्या खासदारांना, मुख्यमंत्री आणि आमदारांनाही दिल्लीलादेखील यायचं आहे, असं म्हटलं.पश्चिम दिल्लीचे भाजपचे खासदार परवेश साहिब सिंह यांनी ट्वीट करून तृणमूल काँग्रेसवर टीका केली. "टीएमसीच्या गुंडांनी निवडणुका जिंकताच आमच्या कार्यकर्त्यांचे प्राण घेतले. भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडल्या, घराला आग लावत आहेत. लक्षात ठेवा, तृणमूल काँग्रेसचे खासदार, मुख्यमंत्री, आमदार यांनाही दिल्ली येथे यावे लागेल. हा इशारा म्हणून समजा. निवडणुकीत जय-पराजय होत असतो, खून नव्हे," असंही ते म्हणाले. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दखलपश्चिम बंगाल निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर रविवारी (२ मे) हुगळीत हिंसाचार झाला होता. अरामबागमधील भाजप कार्यालयालाही काही अज्ञात लोकांनी आग लावली होती. अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये सतत सुरू असलेल्या राजकीय हिंसाचार आणि ११ जणांच्या मृत्यूनंतर आता केंद्रीय गृह मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. मंत्रालयाने राज्य सरकारला विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य करुन राज्यात झालेल्या निवडणुकांनंतर झालेल्या हिंसाचाराचा अहवाल देण्यास सांगितलं आहे.

टॅग्स :BJPभाजपाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसdelhiदिल्लीHome Ministryगृह मंत्रालय