कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (West Bengal Assembly Election) नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा (Mamata Banerjee) पराभव करणार्या सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांना भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे. पश्चिम बंगाल विधानसभेसाठी सुवेंदू अधिकारी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे एकेकाळचे सहकारी सुवेंदू अधिकारी आता मात्र त्यांच्यासमोर नवनवे आव्हानं उभी करताना दिसणार आहेत. (west bengal assembly suvendu adhikari elected as leader of opposition)
सुवेंदू अधिकारी यांनी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राम मतदारसंघातून १,९५६ मतांनी मात दिली. पश्चिम बंगाल विधानसभेत भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांची विरोधी पक्षनेते तर मनोज टिग्गा यांची निवड उपनेता म्हणून करण्यात आली आहे. यापूर्वी सुवेंदू अधिकारी यांच्या व्यतिरिक्त बंगाल भाजपचे प्रदेषाध्यक्ष दिलीप घोष आणि मुकुल रॉय यांचीही नावे विरोधी पक्षनेतेपदाच्या चर्चेत होती.
राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय यांच्याकडून प्रस्ताव
भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला २२ आमदारांनी समर्थन दिले. यानंतर सुवेंदू अधिकारी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. भाजपचे केंद्रीय पर्यवेक्षक रविशंकर प्रसाद, महासचिव भूपेंद्र यादव, महासचिव कैलाश विजयवर्गीय आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.
“प्रवीण दरेकरांना महाराष्ट्र द्वेषाने पछाडलंय, भाजप नेत्यांकडूनच PM मोदींचा अपमान”
दरम्यान, पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या २९४ जागांपैकी २९२ जागांवर ८ टप्प्यात मतदान झाले. या निवडणुकीत भाजपला केवळ ७७ जागांवर समाधान मानावे लागले. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी केवळ तीन जागा जिंकल्या होत्या. तसेच पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर वारंवार हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. या हिंसाचाराचा भाजप सामना करेल. यासाठी सुवेंदू अधिकारींच्या नेतृत्वाखाली आपण सोनार बांगलाचे स्वप्न साकार करू, असे दिलीप घोष यांनी म्हटले आहे.