होळी समारंभात संतापले बाबुल सुप्रियो; भाजपा कार्यकर्त्याच्या लगावली थोबाडीत, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 08:19 AM2021-03-29T08:19:41+5:302021-03-29T08:27:35+5:30
BJP MP Babul Supriyo : एका होळी समारंभात भाजपा खासदार बाबुल सुप्रियो संतापलेले पाहायला मिळाले. रागाच्या भरात त्यांनी सर्वांसमोर कार्यकर्त्याच्या जोरात थोबाडीत लगावल्याची घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. याच दरम्यान एका होळी समारंभात भाजपा खासदार बाबुल सुप्रियो (BJP MP Babul Supriyo) संतापलेले पाहायला मिळाले. रागाच्या भरात त्यांनी सर्वांसमोर एका कार्यकर्त्याच्या जोरात थोबाडीत लगावल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मारहाणीचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाबुल सुप्रियो आणि एका तरुण कार्यकर्त्यात बोलताना काहीसा वाद झाला आणि यानंतर सुप्रियो यांनी कोणताही विचार न करता थेट या कार्यकर्त्याच्या थोबाडीत मारली.
पीडित तरुणाने खासदार सुप्रियो यांच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टॉलीगंज येथे रविवारी (28 मार्च) दुपारी 12 वाजता होळी समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाची देखील तयारी करण्यात आली होती. या कार्यक्रमाला भाजपाचे खासदार बाबुल सुप्रियो 12 वाजता येणार होते. मात्र त्यांना काही कारणांमुळे कार्यक्रम स्थळी येण्यासाठी दुपारचे अडीच वाजले. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागतही केलं. यावेळी तेथे माध्यम प्रतिनिधीही उपस्थित होते.
बाबुल सुप्रियो प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असतानाच एका कार्यकर्त्याने तुम्ही आधीच उशीरा आल्याचं सांगितलं. तसेच आतमध्ये सर्वजण तुमची वाट पाहात आहे, असं सुनावलं. यावर बाबुल सुप्रियो चांगलेच नाराज झाले. त्यांनी माध्यमांशी बोलताना त्या कार्यकर्त्याला केवळ शांत बसण्यास सांगितले. मात्र, माध्यमांशी बोलून झाल्यानंतर त्यांनी संबंधित कार्यकर्त्याला पक्षाच्या कार्यालयात नेले आणि थोबाडात लगावली. मारहाणीची घटना प्रसारमाध्यमांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली.
Farmers Protest : आमदाराला करावा लागला रोषाचा सामना; शेतकऱ्यांनी भाजपा कार्यालयातील झेंडेही जाळलेhttps://t.co/HRYPjTPILj#FarmersProtest#FarmLaws#BJP
— Lokmat (@MiLOKMAT) March 28, 2021
आपण मारहाण करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड झाल्याचं लक्षात येताच सुप्रियो यांनी पत्रकाराचा मोबाईल ओढून घेतला आणि बराच वेळ आपल्याकडेच ठेवला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपा नेते प्रलय पाल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आपल्याला फोन करून नंदीग्राममधील विजयासाठी मदत मागितली असल्याचा दावा प्रलय पाल यांनी केला आहे. पाल यांच्या या दाव्याने बंगालच्या राजकारणात चांगलाच खळबळ उडाली आहे.
West Bengal Assembly Elections 2021 : भाजपाने व्हायरल केली ऑडिओ क्लिप; नेत्याच्या दाव्याने बंगालच्या राजकारणात खळबळ https://t.co/WrkVpJOX0d#WestBengalElections2021#WestBengalElections2021#MamataBanerjee#TMC#BJP#Politicspic.twitter.com/Tq1YKC3Rvg
— Lokmat (@MiLOKMAT) March 27, 2021
"ममता बॅनर्जींनी मला फोन करून नंदीग्राममध्ये मागितली मदत", भाजपा नेत्याचा गौप्यस्फोट
ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे विद्यमान आमदार शुभेंद्रू अधिकारी लढत आहेत. प्रलय पाल यांनी हा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे. ममता यांनी शनिवारी सकाळी मला फोन केला होता. नंदीग्राममध्ये मदत करण्याची विनंती त्यांनी केली होती असं पाल यांनी म्हटलं आहे. या संभाषणाची एक ऑडिओ क्लिपही भाजपाने व्हायरल केली आहे. तर ऑडिओ क्लिपमधील आवाज व्हेरिफाईड नसल्याचं टीएमसीने म्हटलं आहे. "मी त्यांच्यासाठी काम करावं आणि टीएमसीमध्ये प्रवेश करावा असं ममता बॅनर्जींचं म्हणणं होतं. परंतु मी गेल्या अनेक वर्षांपासून शुभेंदू अधिकारी यांच्या कुटुंबासोबत आहे. आता मी भाजपासाठी काम करत आहे" असं पाल यांनी म्हटलं आहे.
West Bengal Assembly Elections 2021 : "घरात घुसून झोपलेल्या भाजपा कार्यकर्त्याला बेदम मारहाण करत त्याची केली हत्या"https://t.co/8JRVtRySdC#WestBengalElections2021#WestBengal#BJP#TMC
— Lokmat (@MiLOKMAT) March 27, 2021