पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता पश्चिम बंगालमध्ये राज्यपालांऐवजी स्वतः मुख्यमंत्रीच स्टेट युनिव्हर्सिटीजचे चान्सलर असतील. पश्चिम बंगालचे मंत्री ब्रत्य बसू यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
विधानसभेत सादर केले जाणार विधेयक - आता सर्व सरकारी युनिव्हर्सिटीजचे चान्सलर राज्यपाल नव्हे, तर स्वतः मुख्यमंत्री असतील, असा निर्णय आज घेण्यात आला आहे. यासंदर्भातील कायद्यात बदल करण्यासाठी विधानसभेत विधेयक सादर केले जाईल, असे पश्चिम बंगालचे मंत्री ब्रत्य बसू यांनी म्हटले आहे.
राज्यपालांनी न विचारताच केल्या होत्या नियुक्त्या - तत्पूर्वी, पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी, राज्य सरकारची सहमती न घेताच, अनेक कुलगुरूंची नियुक्ती केल्याचा आरोप करण्यात आला होता.