कोलकाता - केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील तीन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. यांपैकी एक भवानीपूरची जागा आहे. येथून मुख्यमंत्री ममता बॅनर्जीनिवडणूक लढवतील, कारण बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र, भवानीपूर जागेसाठी होणारी पोटनिवडणूकही नंदीग्रामपेक्षा कमी नसेल. कारण भाजप ममतांच्या विरोधात मोठ्या चेहऱ्यांवर डाव लावण्याचा विचार करत आहे. (West Bengal BJP decide candidate against cm mamata banerjee in bhabanipur bypoll)
माध्यमांतील वृत्तांनुसार, भाजपाकडून अभिनेत्याचे नेते झालेले रुद्रनील घोष, माजी राज्यपाल तथागत रॉय, टीएमसीचे माजी खासदार दिनेश त्रिवेदी आणि भाजप नेते डॉ. अनिर्बन गांगुली यांच्या नावाचा संभाव्य उमेदवार म्हणून सर्वाधिक विचार होत आहे. ममता 2011 आणि 2016 च्या निवडणुकीत, भवानीपूरमधून विजयी झाल्या होत्या. तृणमूल काँग्रेसने भवानीपूर, समशेरगंज आणि जांगीपूर जागांवरील पोटनिवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. ममता बॅनर्जी भवानीपूरमधून, झाकीर हुसेन जांगीपूरमधून तर अमीरुल इस्लाम समशेरगंजमधून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
भवानीपूरमध्ये ममतांविरोधात उमेदवार उतरवू नका अन्यथा...; तृणमूल काँग्रेसचा भाजपला सल्ला
काँग्रेस आणि डाव्यांमध्येही उमेदवारांबाबत मंथन सुरू -यातच, काँग्रेसनेही सोमवारी बैठक बोलावली आहे. या बैठकीत कॉंग्रेस पोटनिवडणुकांसाठी आपले उमेदवार जाहीर करेल अथवा डाव्यांसोबत आघाडीची घोषणा करेल. महत्वाचे म्हणजे, विधानसभा निवडणुकीत भवानीपूर मतदारसंघातून रुद्रनिल घोष हे भाजपचे उमेदवार होते. मात्र, टीएमसीच्या सोहनदेव चट्टोपाध्याय यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. यानंतर, सोहनदेब यांनी ममतांसाठी ही जागा खाली केली होती.
भवानीपूर जागेसाठी 30 सप्टेंबरला मतदान -निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 30 सप्टेंबरला बंगालमध्ये पोटनिवडणूक होणार आहे आणि 3 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. पश्चिम बंगालमधील 3 विधानसभा जागांसाठी 13 सप्टेंबरपर्यंत नामांकन केले जाईल. तर 16 सप्टेंबर ही नामांकन मागे घेतले शेवटची तारीख असेल.
"माझ्यावरील आरोप सिद्ध झाले तर मी स्वत: लोकांसमोर फासावर जाईन"
ममतांची खुर्ची पणाला - ममता बॅनर्जींना मुख्यमंत्री पदावर टीकून राहण्यासाठी ही पोटनिवडणूक जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी यांच्याकडून पराभूत होऊन मुख्यमंत्री झालेल्या ममता बॅनर्जी यांना 5 नोव्हेंबरपर्यंत आमदार होणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्रामच्या निवडणूक निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र, यावर पुढील सुनावणी 15 नोव्हेंबरला होणार आहे.