कोलकात्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व्यासपीठावर भाषण करण्यासाठी जात असताना या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे नाराज होत ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला. तसंच त्यांनी ही गर्दी एका खास पक्षाची असल्याचा आरोप भाजपावर केला होता. कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या घोषणाबाजीला ममता बॅनर्जी यांनी कडाडून विरोध दर्शवला होता. दरम्यान, ममता बॅनर्जींनी हा प्रकार म्हणजे बंगालचा आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा अवमान असल्याचं म्हणत भाजपावर जोरदार टीका केली."व्हिक्टोरिया मेमोरिअल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मला अपमान सहन करावा लागला. भाजपानं बंगालच्या प्रतिष्ठित लोकांचा यापूर्वीही अपमान केला आहे. आताही भाजपा तसंच करत आहे. भाजपाचं नाव भारत जलाओ पार्टी असं ठेवलं पाहिजे," असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा शाधला. हुगळीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान त्या बोलत होत्या. "आपला शिरच्छेद केला तरी चालेल पण आपण भाजपासमोर कधीही झुकणार नाही," असंही त्या म्हणाल्या.
भाजपाचं नाव 'भारत जलाओ पार्टी' ठेवलं पाहिजे; ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर
By जयदीप दाभोळकर | Published: January 25, 2021 5:32 PM
आपला देशाच्या पंतप्रधानांसमोर अपमान करण्यात आला, ममता बॅनर्जींंच वक्तव्य
ठळक मुद्देयापूर्वी एका कार्यक्रमात जय श्रीरामच्या घोषणेनंतर ममता बॅनर्जींनी व्यक्त केला होता संतापदेशाच्या पंतप्रधानांसमोर आपला अपमान, ममता बॅनर्जींचं वक्तव्य