शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

ममतांनी घेतली सोनिया गांधींची भेट; 'या' मोठ्या मुद्यांवर झाली चर्चा; राहुल गांधीही होते उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 6:23 PM

ममतांनी सोनिया गांधींची भेट घेण्यापूर्वी विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचे आवाहन केले होते. विरोधी पक्षांनी एकत्रित यावे, अशी सोनिया गांधींची इच्छा आहे, असेही ममता म्हणाल्या होत्या.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या पाच दिवसीय दौऱ्यात आज तिसऱ्या दिवशी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. सध्या देशभरात विरोधी पक्षांच्या एकजुटीवर चर्चा सुरू असतानाच ममतांनी ही भेट घेतली आहे. तसेच, पेगासीस, कृषी कायदे आणि महागाईच्या मुद्द्यांवर संसद ठप्प आहे. अशातच झालेल्या या भेटीला अत्यंत महत्व आहे. (West bengal CM Mamata Banerjee meets congress president Sonia Gandhi and Rahul Gandhi also in delhi)

या महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा -सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर ममता म्हणाल्या, सोनिया गांधींसोबतची भेट अत्यंत सकारात्मक झाली. विरोधी पक्षांची एकी, पेगासीस आणि सध्याची राजकीय परिस्थिती यांवर चर्चा झाली. भाजपला हरविण्यासाठी एकत्रित यावे लागेल. पेगासीस मुद्द्यावर ममता म्हणाल्या, यावर सरकार उत्तर का देत नाही. सरकारने संसदेत उत्तर द्यावे.

Mamata Banerjee: संपूर्ण देशात 'खेला' होणार, २०२४ ची निवडणूक मोदी विरुद्ध संपूर्ण देश अशी रंगणार!; ममता बॅनर्जींचा एल्गार

ममतांनी सोनिया गांधींची भेट घेण्यापूर्वी विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचे आवाहन केले होते. विरोधी पक्षांनी एकत्रित यावे, अशी सोनिया गांधींची इच्छा आहे, असेही ममता म्हणाल्या होत्या. काँग्रेसला स्थानिक पक्षांवर विश्वास आहे.

ममता म्हणाल्या सर्व स्थानिक पक्ष एकत्रित आल्यास, एका पक्षाला भारी ठरतील. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची एकजूट आणि चेहरा, यांवर बोलताना त्या म्हणाल्या, मी काही राजकीय ज्योतिषी नाही. त्यावेळच्या स्थितीवर सर्व अवलंबून असेल. जर कुणी दुसऱ्यानेही नेतृत्व केले, तरी समस्या नाही. त्या म्हणाल्या, कुणाला तरी नेतृत्व करावेच लागेल. वेळ आली, की चर्चा करू. मत थोपवण्याची माझी इच्छा नाही. मी सोनिया गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना भेटत आहे. कालच लालू यादवने फोनवर चर्चा केली. आम्ही रोज चर्चा करत आहोत. आणखी तीन वर्ष आहेत. आम्ही चर्चा करत आहोत. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा