कोलकाता -पेट्रोल-डिझेलच्या (petrol diesel) सातत्याने वाडत असलेल्या किमतींविरोधात आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerje) रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री ममता यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात कोलकात्यात ई-बाइक रॅली काढली. यादरम्यान त्या इलेक्ट्रीक स्कूटीवर होत्या. मात्र, जेव्हा त्यांनी स्वतःच ती स्कूटी चालविण्यासाठी घेतली, तेव्हा त्यांचा तोल गेला. मात्र, त्या पडता-पडता बालंबाल बचावल्या. (West Bengal CM Mamata Banerjee nearly falls while driving an electric scooter in howrah)
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज कोलकात्यात ई-बाइक रॅली काढली. यावेळी कोलकात्याचे मेयर फिरहाद हकीम यांच्या ई-बाइकवर मागे बसलेल्या ममतांनी गळ्यात महागाईचा फलकही घातला होता. हरीश चटर्जी स्ट्रिटपासून सचिवालय नबन्नापर्यंत ही ई-बाइक रॅली काढण्यात आली.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हावडा येथे इलेक्ट्रिक स्कूटी चालविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा रक्षक आणि समर्थकांत स्कूटी चालविण्याच्या प्रयत्नात त्यांचा तोल गेला. मात्र, त्यांच्या सोबत चालत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना पडता-पडता वाचवले. यानंतर त्यांनी पुन्हा काही अंतरापर्यंत स्कूटी चालवली. यावेळी लोकही त्यांच्यासोबत चालत होते.
नबन्ना येथे पोहोचल्यानंतर ममतांनी केंद्रातील मोदी सरकारवरही जबरदस्त हल्ला चढवला. त्या म्हणाल्या, नोटाबंदी, पेट्रोल-डिझेल आणि कोळशाच्या वाढत्या किमतींमुळे देश बॅकफूटवर जात आहे. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शाह जबाबदार आहेत. ते नेताजी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने तयार झालेल्या स्टेडियमचे नावही बदलत आहेत. खूप वाईट वाटते, ते एखाद्या दिवशी देशाचे नावही बदलतील.
निवडणूक संपता-संपता ममता दीदीही म्हणतील 'जय श्रीराम', बंगलामध्ये दिसला अमित शाहंचा रुद्रावतार