तामिळनाडू सरकारचे मंत्री उदयनिधी यांनी सनातन धर्मासंदर्भात केलेल्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. हा मुद्दा उचलत भाजपने विरोधी पक्षाची आघाडी असलेल्या इंडियावर (I.N.D.I.A.) निशाणा साधत, काँग्रेस आणि टीएमसीसारखे पक्ष या वक्तव्यावर गप्प का आहेत? असा सवाल केला आहे. यातच, आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पीटीआयसोबत बोलताना ममता म्हणाल्या, "मी तामिळनाडूच्या लोकांचा आणि सीएम एमके स्टॅलिन यांचा आदर करते. प्रत्येक धर्माची आपली भावना असते. भारत 'विविधतेत एकते'चा विचार करतो, जो आपला गाभा आहे. आपण लोकांचा एखादा समूह दुखावला जाईल, अशा कुठल्याही प्रकरणात सामील होणे योग्य नाही."
"आपण प्रत्येक धर्माचा सन्मान करायला हवा" -"मी सनातन धर्माता सन्मान करते. आम्ही पूजा पाठ करणाऱ्या पुरोहितांना पेन्शन देतो. बंगालमध्ये दुर्गा पूजा मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. आम्ही मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्चमध्ये जातो. मला वाटते की, आपण प्रत्येक धर्माचा स्नाम करायला हवा."
अपल्या वादग्रस्त वक्तव्यावर उदयनिधी कायम- तामिळनाडूचे मुख्यंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातनसंदर्भात केलेल्या वक्तव्यानतंर, ते राजकीय विरोधकांच्या शिण्यावर आले आहेत. असे असतानाही ते आपल्या वक्तव्यावर कायम आहेत. उदयनिधी यांनी सनातन धर्म नष्ट करण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.