भाजपनंतर संदेशखाली येथे जात असलेल्या काँग्रेस नेत्यांनाही रोखलं; अधीर रंजन म्हणाले, CM ममता क्रूरतेची...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 05:05 PM2024-02-16T17:05:03+5:302024-02-16T17:05:54+5:30
संदेशखालीमध्ये जाण्यापासून रोखल्यानंतर, काँग्रेस खासदार अधीर रंजन यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे.
काँग्रेस खासदार तथा पश्चिम बंगालकाँग्रेसाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनाही संदेशखालीमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर तेथे जाण्यापासून रोखण्यात आले आहे. यावेळी पोलीस आणि अधीर रंजन यांच्यात शाब्दिक बाचाबाचीही झाली. जेव्हा घोषणाबाजी करत काँग्रेस नेते आणि काँग्रेस प्रतिनिधी पुढे जात होते, तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवले आणि रामपूरमध्ये बॅरिकेडिंग केली. तत्पूर्वी, संदेशखालीमध्ये शुक्रवारी सकाळी भाजपच्या शिष्टमंडळालाही रोखण्यात आले होते.
संदेशखालीमध्ये जाण्यापासून रोखल्यानंतर, काँग्रेस खासदार अधीर रंजन यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. अधीर म्हणाले, ममता क्रूरतेची रानी आहे. त्या आगीशी खेळत आहेत. आम्ही बॉम्ब अथवा बंदुका घेऊन चाललो नाही. भाजपलाही थांबवले, मात्र ते वेगळे आहेत आणि आम्ही वेगळे आहोत. NCPCR ने संदेशखालीमध्ये पश्चिम बंगाल पोलीस आणि समाजकंटकांच्या एका गटाला कथित गैरव्यवहार केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.
भाजपच्या फॅक्ट फाइंडिंग टीमलाही रोखलं गेलं -
महत्वाचे म्हणजे, यापूर्वी शुक्रवारी भाजपच्या शिष्टमंडळालाही संदेशखाली येथे जाण्यापासून रोखण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपची फॅक्ट फाइंडिंग टीम पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे जात होती. यात भाजपचे सहा सदस्य सामील होते. या टीमला पोलिसांनी रस्त्यातच आडवले होते.