कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत भलेही भाजपच्या मतात वाढ झाली असेल; पण पक्षात मात्र फार काही आलबेल नाही. आरएसएसचे प्रचारक दिलीप घोष यांच्याकडे राज्य शाखेची जबाबदारी सोपविल्यानंतर राज्यात वाद वाढला आहे. पक्षातील एका वर्गाचा असा आक्षेप आहे की, आरएसएसच्या इशाऱ्यावरून येथे कारभार सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी हे आरोप फेटाळले आहेत. राज्याच्या राजकारणात बॅक बेंचर असलेल्या भाजपने २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत १७ टक्के मते मिळविली होती, तर काही महिन्यांपूर्वीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढत पक्षाने तीन जागा जिंकल्या होत्या. राज्यातील एका भाजप नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष राहुल सिन्हा यांच्याकडून आरएसएसचे प्रचारक दिलीप घोष यांच्याकडे जबाबदारी देण्यात आल्यानंतर पक्षांतर्गत वाद वाढले आहेत. (वृत्तसंस्था)>अनेकांना केले बाजूलाघोष यांना २०१५ मध्ये संघातून पक्षात घेण्यात आले होते. डिसेंबर २०१५ मध्ये प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांच्या काळात पक्षात प्रमुख पदावर राहिलेल्या नेत्यांना बाजूला हटविण्यात आले आहे.
पश्चिम बंगाल भाजपामध्ये असंतोष
By admin | Published: July 23, 2016 5:33 AM