कोलकाता - आठवडाभरापासून चाललेला पश्चिम बंगालमधीलडॉक्टरांचा संप अखेर संपुष्टात आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि संपकर्ते डॉक्टर यांच्यात झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर संप मागे घेण्याची घोषणा डॉक्टरांनी केली आहे. संपकर्त्या डॉक्टरांनी केलेल्या मागण्या मान्य करण्यात आल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे. तसेच संपकर्ते डॉक्टर लवकरच कामावर परततील, अशी माहिती त्यांनी दिली. सरकारी रुग्णालयात तक्रार निवारण कक्ष आणि प्रत्येक रुग्णालयात एक नोडल पोलीस अधिकारी तैनात करण्याची डॉक्टरांनी केलेली मागणी मान्य करण्यात आली आहे.
पश्चिम बंगालमधील डॉक्टरांचा संप अखेर मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 8:41 PM