West Bengal election : कोरोनाची दुसरी लाट म्हणजे ‘मोदी-निर्मित Tragedy’; बंगालच्या मुख्यमंत्री ममतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 05:30 PM2021-04-21T17:30:50+5:302021-04-21T17:33:25+5:30

ममता म्हणाल्या, ‘‘कोरोनाची दुसरी लाट अत्यंत वेगवान आहे. याला मी मोदी निर्मित ट्रॅजेडी म्हणेन. ना इंजंक्शन्स उपलब्ध आहेत, ना ऑक्सिजन. देशात एवढी कमतरता असतानाही लशींचे डोस आणि औषधी बाहेर पाठविली जात आहे.’’ (West Bengal election 2021)

West Bengal election 2021 CM Mamata Banerjee says corona second wave pandemic created by pm modi | West Bengal election : कोरोनाची दुसरी लाट म्हणजे ‘मोदी-निर्मित Tragedy’; बंगालच्या मुख्यमंत्री ममतांचा हल्लाबोल

West Bengal election : कोरोनाची दुसरी लाट म्हणजे ‘मोदी-निर्मित Tragedy’; बंगालच्या मुख्यमंत्री ममतांचा हल्लाबोल

googlenewsNext

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करत मोठा आरोप केला आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आणि तिचे व्यवस्थापन ‘‘मोदी-निर्मित Tragedy’’ आहे, असे ममतांनी म्हटले आहे. तसेच, पश्चिम बंगालचे नेतृत्व ‘‘बंगाल इंजिन’’ सरकारच करेल, मोदींचे ‘‘डबल इंजिन’’ सरकार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला. त्या एका निवडणूक सभेत बोलत होत्या. (West Bengal election 2021 CM Mamata Banerjee says corona second wave pandemic created by pm modi)

ममता म्हणाल्या, ‘‘कोरोनाची दुसरी लाट अत्यंत वेगवान आहे. याला मी मोदी निर्मित ट्रॅजेडी म्हणेन. ना इंजंक्शन्स उपलब्ध आहेत, ना ऑक्सिजन. देशात एवढी कमतरता असतानाही लशींचे डोस आणि औषधी बाहेर पाठविली जात आहे.’’ यावेळी ममतांनी, ही निवडणूक पश्चिम बंगालला वाचविण्याची आणि बंगाली मातांचा सन्मान वाचविण्याची लढाई आहे, असे म्हटले आहे.  

CoronaVaccine: कोव्हॅक्सीन अधिकांश व्हेरिएन्टवर प्रभावशाली, डबल म्यूटेंटचाही करू शकते सामना, ICMRचा दावा

‘‘आपले राज्य बंगाल इंजिन सरकार चालवेल, मोदींचे डबल इंजिन सरकार नाही. आम्ही गुजरातला आपल्या राज्यावर कब्जा करू देणार नाही आणि दिल्लीवरून सरकार चालवू देणमार नाही. बंगालवर बंगालच राज्य करेल. भाजप नेते, आपल्या निवडणूक सभांतमधून जनतेला, राज्यात डबल इंजिन सरकार बनविण्याचे आवाहन करत आहेत. याचा अर्थ केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार, असा होतो. 

यावेळी ममतांनी जनतेला, डावे, काँग्रेस आणि इंडियन सेक्यूलर फ्रंट (आयएसएफ)च्या आघाडीला मत न देण्याचेही आवाहन केले आहे. तसेच, यामुळे भाजपचा हात मजबूत होईल, असेही ममता म्हणाल्या. आता भाजप निवडणूक प्रचारासाठी इतर राज्यांतून लोक घेऊन येत आहे आणि येथील लोकांत कोरोना संक्रमण पसरवत आहे. तसे तर आपण बेडची संख्या वाढविली  आहे. मात्र, मी लोकांना विनती करेल, की जर कोरोनाची अधिक लक्षणे नसतील, तर त्यांनी घरातच आयसोलेट व्हावे, असेही ममता म्हणाल्या. तसेच, यावेळी त्यांनी हलकी लक्षणं असलेल्या कोरोना रुग्णांना सायंकाळी सहा वाजल्यानंतर  मतदान करण्याचेही आवाहन केले आहे.

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

2 मेपर्यंत ममतांची दुखापत ठीक होईल, त्या चालत जाऊन आपला राजीनामा देतील -
पश्चिम बंगालमध्ये आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्रीममता बॅनर्जी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे सत्तेत येण्यासाठी भाजपनंही पूर्णपणे आपल्याला झोकून दिलं आहे. दरम्यान, रविवारी आयोजित एका रॅलीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. "मी अशी अपेक्षा करतो की ममता बॅनर्जी यांना झालेली दुखापत २ मे पर्यंत ठीक होईल. जेणेकरून त्या राज्यपालांकडे आपला राजीनामा द्यायला जातील, तेव्हा आपल्या पायांवर चालत जातील," असे शाह यांनी म्हटले आहे.

CoronaVaccine: कोव्हॅक्सीन अधिकांश व्हेरिएन्टवर प्रभावशाली, डबल म्यूटेंटचाही करू शकते सामना, ICMRचा दावा

Web Title: West Bengal election 2021 CM Mamata Banerjee says corona second wave pandemic created by pm modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.