शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

West Bengal election : कोरोनाची दुसरी लाट म्हणजे ‘मोदी-निर्मित Tragedy’; बंगालच्या मुख्यमंत्री ममतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 5:30 PM

ममता म्हणाल्या, ‘‘कोरोनाची दुसरी लाट अत्यंत वेगवान आहे. याला मी मोदी निर्मित ट्रॅजेडी म्हणेन. ना इंजंक्शन्स उपलब्ध आहेत, ना ऑक्सिजन. देशात एवढी कमतरता असतानाही लशींचे डोस आणि औषधी बाहेर पाठविली जात आहे.’’ (West Bengal election 2021)

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करत मोठा आरोप केला आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आणि तिचे व्यवस्थापन ‘‘मोदी-निर्मित Tragedy’’ आहे, असे ममतांनी म्हटले आहे. तसेच, पश्चिम बंगालचे नेतृत्व ‘‘बंगाल इंजिन’’ सरकारच करेल, मोदींचे ‘‘डबल इंजिन’’ सरकार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला. त्या एका निवडणूक सभेत बोलत होत्या. (West Bengal election 2021 CM Mamata Banerjee says corona second wave pandemic created by pm modi)ममता म्हणाल्या, ‘‘कोरोनाची दुसरी लाट अत्यंत वेगवान आहे. याला मी मोदी निर्मित ट्रॅजेडी म्हणेन. ना इंजंक्शन्स उपलब्ध आहेत, ना ऑक्सिजन. देशात एवढी कमतरता असतानाही लशींचे डोस आणि औषधी बाहेर पाठविली जात आहे.’’ यावेळी ममतांनी, ही निवडणूक पश्चिम बंगालला वाचविण्याची आणि बंगाली मातांचा सन्मान वाचविण्याची लढाई आहे, असे म्हटले आहे.  CoronaVaccine: कोव्हॅक्सीन अधिकांश व्हेरिएन्टवर प्रभावशाली, डबल म्यूटेंटचाही करू शकते सामना, ICMRचा दावा

‘‘आपले राज्य बंगाल इंजिन सरकार चालवेल, मोदींचे डबल इंजिन सरकार नाही. आम्ही गुजरातला आपल्या राज्यावर कब्जा करू देणार नाही आणि दिल्लीवरून सरकार चालवू देणमार नाही. बंगालवर बंगालच राज्य करेल. भाजप नेते, आपल्या निवडणूक सभांतमधून जनतेला, राज्यात डबल इंजिन सरकार बनविण्याचे आवाहन करत आहेत. याचा अर्थ केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार, असा होतो. 

यावेळी ममतांनी जनतेला, डावे, काँग्रेस आणि इंडियन सेक्यूलर फ्रंट (आयएसएफ)च्या आघाडीला मत न देण्याचेही आवाहन केले आहे. तसेच, यामुळे भाजपचा हात मजबूत होईल, असेही ममता म्हणाल्या. आता भाजप निवडणूक प्रचारासाठी इतर राज्यांतून लोक घेऊन येत आहे आणि येथील लोकांत कोरोना संक्रमण पसरवत आहे. तसे तर आपण बेडची संख्या वाढविली  आहे. मात्र, मी लोकांना विनती करेल, की जर कोरोनाची अधिक लक्षणे नसतील, तर त्यांनी घरातच आयसोलेट व्हावे, असेही ममता म्हणाल्या. तसेच, यावेळी त्यांनी हलकी लक्षणं असलेल्या कोरोना रुग्णांना सायंकाळी सहा वाजल्यानंतर  मतदान करण्याचेही आवाहन केले आहे."आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

2 मेपर्यंत ममतांची दुखापत ठीक होईल, त्या चालत जाऊन आपला राजीनामा देतील -पश्चिम बंगालमध्ये आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्रीममता बॅनर्जी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे सत्तेत येण्यासाठी भाजपनंही पूर्णपणे आपल्याला झोकून दिलं आहे. दरम्यान, रविवारी आयोजित एका रॅलीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. "मी अशी अपेक्षा करतो की ममता बॅनर्जी यांना झालेली दुखापत २ मे पर्यंत ठीक होईल. जेणेकरून त्या राज्यपालांकडे आपला राजीनामा द्यायला जातील, तेव्हा आपल्या पायांवर चालत जातील," असे शाह यांनी म्हटले आहे.

CoronaVaccine: कोव्हॅक्सीन अधिकांश व्हेरिएन्टवर प्रभावशाली, डबल म्यूटेंटचाही करू शकते सामना, ICMRचा दावा

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या