मुख्यमंत्री ममता बॅनर्जी झाल्या जखमी अन् घटनेच्या साक्षीदाराला लागली लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 05:38 PM2021-03-12T17:38:45+5:302021-03-12T17:43:28+5:30
West Bengal Election 2021: ममता बॅनर्जींवर नंदिग्राममध्ये हल्ला; तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली
कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी नंदिग्राममध्ये आलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसनं केला आहे. तर ममता बॅनर्जी लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी नाटक करत असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाकडून करण्यात येत आहे. कथित हल्ल्यात जखमी झाल्याचा फायदा बॅनर्जींना होऊ शकतो, असं मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. ममता बॅनर्जींना जखमी झाल्याचा राजकीय फायदा किती होणार २ मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालात समजेल. पण एका व्यक्तीला मात्र ममता बॅनर्जी जखमी झाल्यानं 'लॉटरी'च लागली आहे.
ममता बॅनर्जींची जखम भाजपला महागात पडणार?; शरद पवारांप्रमाणे 'गेम' फिरवणार?
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी झाल्यानं आपल्याला फायदा झाल्याचा दावा एका व्यक्तीनं केला आहे. बॅनर्जी जखमी झाल्या त्यावेळी निमाई मैती नावाची व्यक्ती तिथे उपस्थित होती. मैती यांनी संपूर्ण घटना पाहिली. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार मैती यांना ५ हजार रुपयांचं बक्षीस मिळालं आहे. ममता बॅनर्जींसोबत घडलेली घटना पाहिल्यानंतर नशीब बदलल्याचं मैती यांनी सांगितलं.
रूग्णालयातून ममता बॅनर्जींनी जारी केला व्हिडीओ; म्हणाल्या, "आता व्हिलचेअरवरून प्रचार करणार"
ममता बॅनर्जी जखमी होताच मी त्यांच्या मदतीला धावलो. त्यांना प्रथमोपचार दिले. त्यामुळेच मला लॉटरी लागली, असं मैती म्हणाले. दोन दिवसांपूर्वी (१० मार्च) ममता बॅनर्जी नंदिग्राममध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. 'जसजसे लोक पुढेपुढे होऊ लागले, ममता बॅनर्जी यांचा पाय दरवाज्याला आदळला आणि त्या जखमी झाल्या,' असं मैती यांनी सांगितलं.
"ममतांना पराभूत करणार, नंदिग्रामचा संग्राम मीच जिंकणार,’’ शुभेंदू अधिकारींचे प्रतिआव्हान
निमाई मैती यांचं मिठाईचं दुकान
नंदिग्राममधल्या बेरुलिया बाजारात निमाई मैती यांचं मिठाईचं दुकान आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला होताच मैती रातोरात चर्चेत आले. आता मैती यांनी एक लॉटरीचं तिकीट जिंकलं आहे. ममता बॅनर्जींना केलेल्या मदतीमुळेच आपल्याला लॉटरी लागल्याची भावना मैतींनी व्यक्त केली.
आता खर्च करणार नाही; नंतर मिठाई वाटणार
लॉटरीतून जिंकलेल्या पैशाचा वापर न करण्याचा निर्णय मैती यांनी घेतला आहे. एखादं आवश्यक काम करण्यासाठी पैशाचा वापर करण्याचा विचार त्यांनी केला होता. मात्र आता है पैसे सांभाळून ठेवणार असल्याचं मैती यांनी सांगितलं. ममता बॅनर्जींना दुखापत झाल्यानंतर मी ती बर्फानं शेकवली. त्यानंतर माझं नशीबच बदललं. आता निवडणूक जिंकल्यावर याच पैशानं मिठाई वाटेन, असं मैती म्हणाले.