पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणूक प्रचारादरम्यान पायाला आणि मानेला दुखापत झाली होती. दरम्यान, आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. त्यानंतर सध्या ममता बॅनर्जी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी यांनी रुग्णालयातूनच एक व्हिडीओ जारी केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरू हा व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडीओद्वारे ममता बॅनर्जी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांतता कायम ठेवण्याचं आवाहन केलं आहे. तसंच दुखापत झाल्यानंतर आपलं काम बाधित होणार नाही आणि आपण व्हिलचेअरवरून प्रचार करणार असल्याचंही त्यांनी व्हिडीओद्वारे सांगितलं. "मला पुढचे काही दिवस व्हिलचेअरवरच राहावं लागेल. असं असलं तरी मी निवडणूक प्रचाराता बाधा येऊ देणार नाही. मी व्हिलचेअरवरच प्रचार करणार," असं त्या म्हणाल्या.ममता बॅनर्जी यांना रोखण्यासाठी काही पळपुट्या लोकांनी अशी कृती केली. परंतु या कृतीत कोणीही यशस्वी होऊ शकणार नाही. ममता बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्या हे एक षडयंत्र आहे, असं मत पक्षाचे नेते पार्थ चटर्जी यांनी म्हटले. ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी यांचा रुग्णालयामधील फोटो ट्वीट करत भाजपाला इशारा दिला आहे. भाजपाने तयार रहावं. रविवारी २ मे रोजी त्यांना बंगालच्या लोकांची ताकद दिसणार असल्याचंही ते म्हणाले.
West Bengal Election : रूग्णालयातून ममता बॅनर्जींनी जारी केला व्हिडीओ; म्हणाल्या, "आता व्हिलचेअरवरून प्रचार करणार"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 3:54 PM
west bengal election 2021 : गुरूवारी प्रचारादरम्यान ममता बॅनर्जींच्या पायाला झाली दुखापत, रुग्णालयात करण्यात आलं दाखल
ठळक मुद्देगुरूवारी प्रचारादरम्यान ममता बॅनर्जींच्या पायाला झाली दुखापतसध्या त्यांच्यावर रुग्णालयात सुरू आहेत उपचार