West Bengal Election 2021: मला हिंदू धर्म शिकवायला जाऊ नका, मी ब्राह्मणाची मुलगी; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 05:12 PM2021-03-26T17:12:34+5:302021-03-26T17:17:16+5:30
West Bengal Assembly Election 2021: मेदिनीपूरच्या चंद्रकोणा येथील सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
मेदिनीपूर : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा (West Bengal Assembly Election 2021) रणसंग्राम आता अधिक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच आता मेदिनीपूरच्या चंद्रकोणा येथील सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. मला हिंदू धर्म शिकवायला जाऊ नका, मी ब्राह्मणाची मुलगी आहे, असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे. (West Bengal Assembly Election 2021 mamata banerjee says i am brahmin daughter should not teach me hinduism)
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हिंदू कार्ड खेळायला सुरुवात केली आहे, असे सांगितले जात आहे. मला हिंदू धर्म शिकवायला जात आहेत. मी एका ब्राह्मणाची मुलगी आहे. तुमच्यापेक्षा अधिक हिंदू धर्म जाणते. माझ्यासाठी सगळे समान आहेत. सर्व जण समान आहेत, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी भाजपवर केली आहे.
सत्तेत येण्यासाठी काँग्रेस कोणाशीही युती करू शकतो; पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र
मला भेदभाव करायला शिकवले नाही
मी भेदभाव करत नाही. मला माझ्या आई-वडिलांनी भेदभाव करायला शिकवले नाही. माझ्या घरात ज्या चार बाउरी महिला काम करत आहेत. सर्वांना नोकरी दिली आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचार काल थंडावला आहे.
दाढी वाढवून कोणी रविंद्रनाथ होत नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत, दाढी वाढवून कोणी रविंद्रनाथ टागोर होता येत नाही. नोटबंदीचा पैसा कुठे गेला? बँकांचा पैसा कुठे गेला? सरकारी मालमत्ता विकायला काढल्या जात आहेत आणि आता बंगालचा सोनार बांग्ला करण्याच्या बाता मारत आहेत. रविंद्रनाथ टागोर यांची जन्मभूमी जोडासांकू सांगतात. विद्यासागर यांची मूर्ती तोडतात. गुजरातमधील दंगलीचे नायक आहेत, असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
दीदी, ओ दीदी... तुमच्या पापांचा घडा भरलाय, आता जनताच शिक्षा देईल: PM मोदी
दरम्यान, शनिवार, २७ मार्च रोजी पश्चिम बंगालमधील पाच जिल्ह्यातील एकूण ३० विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यामध्ये पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील ६, पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील ७, झाडग्राम जिल्ह्यातील ४ तर पुरुलिया जिल्ह्यातील ९, बाकुंडा जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, यात ७३ लाख ८० हजार ९४२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत असणार आहे.