ममतांना जबर धक्का, TMC मध्ये उभी फूट! तब्बल 10 आमदारांसह तीन खासदार भाजपच्या संपर्कात?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 02:43 PM2021-03-05T14:43:47+5:302021-03-05T14:48:05+5:30
ममता शुक्रवारचा दिवस आपल्यासाठी शूभ मानतात. त्या आज सर्वच्या सर्व 294 आमदारांची नावे जाहीर करू शकतात. एवढेच नाही, तर यावेळी टीएमसी 100 हून अधिक नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या विचारात आहे. (West Bengal election 2021)
कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) जस-जशा निवडणुका जवळ येत आहेत. तस-तसा नेत्यांच्या पक्षांतरालाही वेग येत आहे. ममता बॅनर्जींचा (Mamata Banerjee) पक्ष तृणमूल काँग्रेस (TMC) आज बंगाल निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. मात्र, या पूर्वीच वृत्त आले आहे, की मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांच्या पक्षातील आमदार आणि खासदारांकडून जबर झटका बसण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जींच्या पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. (West Bengal election 2021 Mamata Banerjee TMC 10 MLAs and 3 MPs in touch with BJP)
बंगालमध्ये आता शिव विरुद्ध राम!; ममता दीदी महाशिवरात्रीच्या दिवशी निवडणूक अर्ज भरणार
10 आमदार आणि तीन खासदार भाजपच्या संपर्कात -
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीएमसीचे 10 आमदार आणि तीन खासदार भाजपच्या संपर्कात आहेत. पुढील काही दिवसांत भाजप या नेत्यांची पार्श्वभूमी तपासून यांना पक्षात घेऊ शकते. याच बरोबर टीएमसीतून आलेल्या आमदारांपैकी भाजप दोन आमदारांना तिकीट देणार नाही.
टीएमसी 294 उमेदवारांची करू शकते घोषणा -
ममता शुक्रवारचा दिवस आपल्यासाठी शूभ मानतात. त्या आज सर्वच्या सर्व 294 आमदारांची नावे जाहीर करू शकतात. एवढेच नाही, तर यावेळी टीएमसी 100 हून अधिक नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या विचारात आहे.
उच्चशिक्षित ममता दीदींकडे नेमकी संपत्ती किती? 'इतके' आहे सोने; पाहा
उमेदवारांच्या घोषणेपूर्वी गुरुवारी टीएमसीनेही निवडणुकीतील रणनीतीसंदर्भात मॅरेथॉन बैठकीचे आयोजन केले होते. यात, ममता सरकारच्या दहा वर्षांतील कामे, वाद संपवणे आणि लोकसभेत अपेक्षित यश न आलेल्या भागांत जनसंपर्क वाढविण्यावर भर देण्यात यावा, असे सांगण्यात आले. ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून गुरुवारी महाशिवरात्रीच्या दिवशी अर्ज भरणार आहेत. याकडे, हिंदू विरोधी छबीच्या आरोपांना उत्तराच्या स्वरुपात पाहिले जात आहे.
"...तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी करूशकतात भाजपशी हात मिळवणी"; मोठ्या नेत्याचा दावा!
बंगालमध्ये कुठल्या टप्प्यात किती जागांसाठी मतदान -
पश्चिम बंगालमधील 294 पैकी 30 जागांवर 27 मार्चला पहिल्या टप्प्यात मतदान होईल, दुसऱ्या टप्प्यात 30 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 31 जागांसाठी, 6 एप्रिलला चौथ्या टप्प्यात 44 जागांसाठी 10 एप्रिलला पाचव्या टप्प्यात 45 जागांसाठी 17 एप्रिलला, सहाव्या टप्प्यात 43 जागांसाठी 22 एप्रिलला, सातव्या टप्प्यात 36 जागांसाठी 26 एप्रिलला तर आठव्या टप्प्यात 35 जागांसाठी 29 एप्रिलला मतदान होईल. तर निकाल 2 मेरोजी लागणार आहे.