"मतदानाच्या दिवशी करा फक्त 'एवढंच' काम; ममतांना बसेल शॉक, मग पाहा...!; गडकरींचा हल्लाबोल

By श्रीकृष्ण अंकुश | Published: March 3, 2021 09:13 PM2021-03-03T21:13:03+5:302021-03-03T21:18:27+5:30

गडकरी पुढे म्हणाले, ''2 मेरोजी परिवर्तन होईल. राज्यात कमळाचा विजय होईल. भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळेल. तीन मेरोजी आपल्या नेत्याची निवड होईल. 4 मेरोजी भाजपचे मुख्यमंत्री शपथ घेतील. आता याला कुणीही रोखू शकत नाही.'' (Nitin Gadkari in West Bengal)

West bengal election 2021 Nitin Gadkari attacks on CM Mamata Banerjee | "मतदानाच्या दिवशी करा फक्त 'एवढंच' काम; ममतांना बसेल शॉक, मग पाहा...!; गडकरींचा हल्लाबोल

"मतदानाच्या दिवशी करा फक्त 'एवढंच' काम; ममतांना बसेल शॉक, मग पाहा...!; गडकरींचा हल्लाबोल

Next
ठळक मुद्देनिवडणूक निकालाच्या दिवशी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना असा शॉक बसेल2 मेरोजी परिवर्तन होईल. राज्यात कमळाचा विजय होईल - गडकरी4 मेरोजी भाजपचे मुख्यमंत्री शपथ घेतील - गडकरी

कोलकाता - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील (West bengal) राजकीय वातावरण जबरदस्त तापले आहे. सर्वच पक्ष एक दुसऱ्यावर निशाणा साधत आहेत. यातच आज केंद्रीय रस्ते आणि परिवहनमंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर (Mamata Banerjee) जबरदस्त हल्ला चढवला. एका रॅलीदरम्यान गडकरी म्हणाले, निवडणूक निकालाच्या दिवशी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना असा शॉक बसेल, की त्या आपल्या खुर्चीवरून दोन फूट वर उडतील. (West bengal election 2021 Nitin Gadkari attacks on CM Mamata Banerjee)

पश्चिम बंगालच्या जोयेपूर येथे एका रॅलीला संबोधित करताना गडकरी म्हणाले, ''मतदानाच्या दिवशी सकाळी उठा, आपल्या कुल देवतेचे स्मरण करा. पोलिंग बूथवर जा आणि कमळाचे बटन दाबा. असा शॉक लागेल, की ममता बॅनर्जी आपल्या खुर्चीवरून दोन फूट वर उडतील. फक्त हा शॉक द्या, मग पाहा राज्यात विकासाचा बल्ब कसा पेटतो.''

WB Election 2021: पंतप्रधान मोदी राहणार बांगलादेशात, परिणाम होणार बंगालच्या निवडणुकीवर; असा आहे भाजपचा 'प्लॅन B'!

गडकरी पुढे म्हणाले, ''2 मेरोजी परिवर्तन होईल. राज्यात कमळाचा विजय होईल. भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळेल. तीन मेरोजी आपल्या नेत्याची निवड होईल. 4 मेरोजी भाजपचे मुख्यमंत्री शपथ घेतील. आता याला कुणीही रोखू शकत नाही.''

''ही निवडणूक, भाजप, टीएमसी, काँग्रेस अथवा सीपीएमच्या भविष्यासाठी नाही. ही निवडणूक, पंतप्रधान मोदी, अमित शाह, जेपी नड्डा, राहुल गांधी अथवा ममता बॅनर्जी यांच्या भविष्यासाठीही नाही. ही निवडणूक, बंगालमधील लोकांच्या भविष्यासाठी आहे. बंगालची प्रतिमा बदलण्याची आणि देशाला जगात महाशक्ती बनविण्याची आमची इच्छा आहे,'' असे गडकरी म्हणाले.

फॉर्म्युला फिरवला अन् पराक्रम घडवला; 'या' पक्षानं मोदी-शहांसोबत काँग्रेसचं टेन्शन वाढवलं

पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान 27 मार्च आणि अखेरच्या टप्प्याचे मतदान 29 एप्रिलला होईल. तर 2 मेरोजी मतमोजणी होणार आहे.
 

Web Title: West bengal election 2021 Nitin Gadkari attacks on CM Mamata Banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.