ममतांनी नंदिग्राममधूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला? शुभेंदूंच्या गडातूनच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 05:01 PM2021-03-09T17:01:14+5:302021-03-09T17:05:27+5:30
मुख्यमंत्री ममतांनी आपल्या सभेदरम्यान चंडीपाठही केला. त्या म्हणाल्या, "माणसांत 70-30 (हिंदू-मुस्लीम) असे काही नसते. (Mamata Manerjee VS Suvendu Adhikari)
कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Manerjee) बुधवारी नंदीग्राममधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यापूर्वी त्यांनी आज नंदीग्राममध्ये (Nandigram ) टीएमसीच्या (TMC) एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी, आपण निवडणुकीसाठी नंदिग्रामच का निवडले हेही सांगितले. (West Bengal election 2021 TMC Leader Mamata Manerjee on Suvendu Adhikari and Nandigram seat)
ममता म्हणाल्या, ''मी भवानीपूरमधूनही निवडणूक लढवू शकले असते. मात्र, नंदीग्राममधील आमदाराने राजीनामा दिला, तेव्हा मी एका रॅलीतून आपल्याकडून जाणण्याचा प्रयत्न केला होता, की मी नंदीग्राममधून निवडणूक लढू शकते? आपण हो म्हणाला होतात. म्हणनच मी येथून लढण्याचा निर्णय घेतला.'' ममता म्हणाल्या, सिंगूर आणि नंदीग्राम ही आंदोलनाची भूमी आहे. यामुळेच या दोहोंपैकी एका जागेवरून लढण्याचा माझा विचार होता.
खळबळजनक! निवडणूक प्रचाराला गालबोट लावण्याचा प्रयत्न?; पोलिसांनी जप्त केले तब्बल 200 गावठी बॉम्ब
मुख्यमंत्री ममतांनी आपल्या सभेदरम्यान चंडीपाठही केला. त्या म्हणाल्या, "माणसांत 70-30 (हिंदू-मुस्लीम) असे काही नसते. फुटीरतेचे राजकारण नंदीग्राममध्ये कामी येणार नाही. नंदीग्रामचे नाव संपूर्ण जगाला माहीत आहे. नंदीग्रामहेच सद्भावनेचे दुसरे नाव आहे. मी सर्वांचे नाव विसरू शकते. मात्र, नंदीग्रामचे नाही. सिंगूर, नंदीग्राम नसते, तर आंदोलनाचे वादळ आले नसते. मीही हिंदू घरातलीच मुलगी आहे. माझ्यासोबत हिंदू कार्ड खेळू नका.''
मुख्यमंत्री ममता म्हणाल्या, बंगालची मुलगी बाहेरची कशी झाली? मी येथे दर तीन महिन्याला येणार. 1 एप्रिलला येथे मतदान होईल. त्यांचे (बीजेपी) एप्रिल फूल करून टाका. एक एप्रिलला खेळ होईल. मला मंदिर , मशीद , गुरुद्वारा... सर्वांचे समर्थन हवे आहे.
ममता बॅनर्जींना मोठा धक्का! ५ आमदारांचा तृणमूल काँग्रेसला रामराम; भाजपमध्ये प्रवेश
भूमी अधिग्रहणाच्या विरोधात नंदीग्राममध्ये झालेल्या आंदोलनानंतरच 2011 मध्ये ममता बॅनर्जी सत्तेत आल्या होत्या. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा सामना आपलेच विश्वासू आणि आता टीएमसी सोडून भाजपत गेलेल्या शुभेंदू अधिकारी यांच्याशी होणार आहे.