West Bengal Election 2021: “पराभवाची जबाबदारी स्वीकारुन पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी राजीनामा द्यावा”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 01:44 PM2021-05-03T13:44:19+5:302021-05-03T13:48:38+5:30

West Bengal Election 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

west bengal election 2021 tmc yashwant sinha demands that pm modi and amit shah should resign | West Bengal Election 2021: “पराभवाची जबाबदारी स्वीकारुन पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी राजीनामा द्यावा”

West Bengal Election 2021: “पराभवाची जबाबदारी स्वीकारुन पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी राजीनामा द्यावा”

Next
ठळक मुद्देपंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी राजीनामा द्यावा२०२४ लोकसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसतीलतृणमूलचे उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांची टीका

कोलकाता: देशभरातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल २ मे रोजी लागले. सर्वांचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपला पराभवाचा मोठा धक्का दिला. देशभरातून ममता बॅनर्जींना शुभेच्छा दिल्या जात असून, भाजपवर टीकास्त्र सोडले जात आहे. भाजपला टक्कर देणारा नवा चेहरा म्हणून ममता बॅनर्जी यांच्याकडे पाहिले जात आहे. यातच आता तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी केंद्रीयमंत्री यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. (west bengal election 2021 tmc yashwant sinha demands that pm modi and amit shah should resign)

पश्चिम बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला सोडचिठ्ठी देत यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट झाल्यावर यशवंत सिन्हा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सिन्हा यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

बंगालमध्ये रडीचा डाव! नंदीग्राम येथील प्रकारानंतर शरद पवारांचे सूचक ट्विट

म्हणून बंगालमधील जनता दुखावली गेली

पश्चिम बंगालमध्ये येऊन पंतप्रधान मोदींसह अनेक भाजप नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर टीकेला सुरुवात केली. मात्र, एका मर्यादेनंतर बंगाली जनतेला ही टीका आवडली नाही. ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या वैयक्तिक आरोपांमुळे बंगाली जनता दुखावली गेली आणि त्याचेच फळ भाजपला या निवडणुकीत दिसले. जनतेने भाजपला नाकारले, अशी प्रतिक्रिया सिन्हा यांनी दिली. या विधानसभा निवडणुकीचे पडसाद २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळतील, असा दावाही सिन्हा यांनी यावेळी केला. 

ही लढाई अशीच सुरू राहील; राहुल गांधी यांनी स्वीकारला काँग्रेसचा पराभव

रडीचा डाव!

बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठिंबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल!, असे ट्विट शरद पवार यांनी केले. तृणमूल काँग्रेसच्या विस्मयचकित करणाऱ्या विजयासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. आपण भविष्यात लोकांच्या कल्याणासाठी एकत्रपणे काम करणे सुरू ठेवुयात. तसेच कोरोनाच्या संकटाचाही मिळून सामना करुयात, असेही शरद पवार यांनी ट्विटरवरून म्हटले आहे. 
 

Web Title: west bengal election 2021 tmc yashwant sinha demands that pm modi and amit shah should resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.