कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा (west bengal assembly election 2021) पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. पहिल्या टप्प्यात भरघोस मतदानाची नोंद करण्यात आली. तृणमूल काँग्रेस आणि भाजपसाठी ही निवडणूक आता प्रतिष्ठेची बनली आहे. यातच अलीकडेच भाजपमधून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या यशवंत सिन्हा यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे. बंगाल निवडणुकीत भाजपला २०० जागा मिळतील, असा विश्वास अमित शाहांनी व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर, बंगाल निवडणुकीत भाजप २९४ पैकी ३०० जागा जिंकेल, असे यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे. (west bengal assembly election 2021 yashwant sinha says that as per my information bjp to be win a total of 300 seats out of 294)
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बंगालमध्ये भाजप २०० पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा शाह यांनी केला. यावरून यशवंत सिन्हा यांनी भाजपला टोला लगावला आहे.
भाजप २९४ पैकी ३०० जागा जिंकेल
बंगाल निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजपने ३० पैकी फक्त २६ जागांवर विजय मिळवणार असल्याचा दावा केला आहे, याबाबत आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांचे आभारी आहोत. माझ्या माहितीप्रमाणे भाजप संपूर्ण ३० आणि २९४ पैकी ३०० जागांवर विजय मिळवेल, अशी उपरोधिक टीका करणारे एक ट्विट यशवंत सिन्हा यांनी केले आहे.
राहुल गांधी फक्त मुलींच्या कॉलेजलाच भेट देतात; माजी खासदाराचे वादग्रस्त विधान
भाजपला मोठा रसगुल्ला मिळेल
भाजप सर्व जागा जिंकणार असल्याचा दावा का करत नाही. बाकीच्या जागा काय काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षासाठी सोडल्या आहेत का, अशी विचारणा करत या निवडणुकीत भाजपला मोठा रसगुल्लाच मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर लगेच भाजप असे दावे का करत आहे, हे समजत नाही. केंद्रीय संस्थांनी उर्वरित टप्प्यातील मतदान होईपर्यंत तटस्थपणे कामे करावीत. लोकांना भाजपला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करून नये, असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी केला.
“POK वर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे, हे आता विसरून जा”
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ३० जागांसाठी ७९.७९ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालसह आसाम विधानसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्पातील मतदान शनिवारी पार पडले. आसाममध्ये पहिल्या टप्प्यात ४७ जागांसाठी ७७ टक्के मतदान झाले.