West Bengal Election 2021 : बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला, तर मुर्शिदाबादच्या लोकांना बांगलादेशी का म्हणता?; ओवेसींचा मोदींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 07:07 PM2021-03-27T19:07:18+5:302021-03-27T19:09:52+5:30
बांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होतं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते.
"बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात आम्हीही सहभागी झालो होतो. तेव्हा मी २० ते २२ वर्षांचा असेन. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होतं, असं पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेश दौऱ्यादरम्यान बोलताना म्हटलं होतं. बांगलादेश स्वातंत्र्य लढ्याच्या ५० व्या वर्षाच्या निमित्ताने मला निमंत्रण देण्यात आले. या गौरवशाली सोहळ्यात सहभागी होता आले, हे माझे भाग्य समजतो, असंही ते म्हणाले होते. आता यावरून एमआयएचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यसाठी त्यांनी सत्याग्रह केला होता. जर बांगलादेशसाठी त्यांनी सत्याग्रह केला होता, मुर्शिदाबादच्या लोकांना ते बांगालादेशी का म्हणतात," असा सवाल ओवेसी यांनी केला. शनिवारी मुर्शिदाबाद येथे आयोजित एका रॅलीला ते संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.
In Bangladesh, PM Narendra Modi yesterday said he did Satyagrah for liberation of Bangladesh. If you did Satyagrah for Bangladesh, then why are you calling people of Murshidabad Bangladeshis. Why are you abusing us?: AIMIM chief Asaduddin Owaisi in Murshidabad, West Bengal pic.twitter.com/y0ir5SQ8mv
— ANI (@ANI) March 27, 2021
"भाजपनं देशात अशाप्रकारे घृणा पसरवली आहे जसं मुस्लीमाचा मुलगा मंदिरात पाणी घेण्यासाठी जातो तेव्हा त्याच्यासोबत गैरवर्तन केलं जातं. मुस्लीमांना जिहादी, आदिवासींना नक्षली आणि सेक्युलर थिंकर्सना राष्ट्रविरोधी असं संबोधलं जातं," असंही ते म्हणाले. "पश्चिम बंगालमध्ये डावेपक्ष आणि काँग्रेसकडून काही होणार नाही. बंगालमीधल मुस्लीम जनता डाव्या पक्षांमुळे चिंतीत आहे. त्यांनी काहीही केलं नाही. तुम्हाला हत्यारं उचलण्याची गरज नाही. केवळ भारताच्या संविधानाला समजून घेत मतदान करण्याची गरज आहे," असंही ओवेसी यांनी नमूद केलं.
BJP has spread so much hatred in the country that when a child with a Muslim name goes to a temple for water, he is thrashed. Muslims are being called 'jihadi', tribals are being called 'Naxals' & secular thinkers are being called 'anti-nationals': AIMIM chief Asaduddin Owaisi pic.twitter.com/E7Vr9KkNY2
— ANI (@ANI) March 27, 2021
पाच वर्षांत करून दाखवू
"ममता बॅनर्जींना विचारा त्यांची राम मंदिराबाबत काय भूमिका आहे. तृणमूल काँग्रेसनं तीन तलाखच्या वेळी वॉकाआऊट केलं पण मतदान का केलं नाही. तुम्ही सर्वांना मतदान केलंय. एकदा आम्हाला मतदान करून पाहा. जे ७० वर्षांमध्ये झालं नाही ते पाच वर्षांमध्ये करून दाखवू," असं आश्वासनही ओवेसी यांनी दिलं. डाव्या पक्षांनी मुस्लीमांच खच्चीकरण केलं. इंन्कलाब येणार येणार म्हणत बंगालच्या मुलांचा नाश केला. तुमची मुलं तुरूंगात पडून राहतील आणि त्यांचं आयुष्य तिकडेच खराब होईल," असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.