"बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात आम्हीही सहभागी झालो होतो. तेव्हा मी २० ते २२ वर्षांचा असेन. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होतं, असं पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेश दौऱ्यादरम्यान बोलताना म्हटलं होतं. बांगलादेश स्वातंत्र्य लढ्याच्या ५० व्या वर्षाच्या निमित्ताने मला निमंत्रण देण्यात आले. या गौरवशाली सोहळ्यात सहभागी होता आले, हे माझे भाग्य समजतो, असंही ते म्हणाले होते. आता यावरून एमआयएचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यसाठी त्यांनी सत्याग्रह केला होता. जर बांगलादेशसाठी त्यांनी सत्याग्रह केला होता, मुर्शिदाबादच्या लोकांना ते बांगालादेशी का म्हणतात," असा सवाल ओवेसी यांनी केला. शनिवारी मुर्शिदाबाद येथे आयोजित एका रॅलीला ते संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.
West Bengal Election 2021 : बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला, तर मुर्शिदाबादच्या लोकांना बांगलादेशी का म्हणता?; ओवेसींचा मोदींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 7:07 PM
बांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होतं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते.
ठळक मुद्देबांगलादेशच्या लढ्यात सहभागी होत सत्याग्रह केला होता. ते माझे पहिलेच आंदोलन होतं, असं पंतप्रधान मोदी७० वर्षात झालं नाही ते ५ वर्षात करून दाखवू, ओवेसींचं आश्वासन