पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीममता बॅनर्जी यांना निवडणूक प्रचारादरम्यान पायाला आणि मानेला दुखापत झाली होती. दरम्यान, आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. यानंतर भाजपनंही प्रतिक्रिया देत ममता बॅनर्जी या राजकारणासाठी हल्ल्याचं खोटं वृत्त पसरवत असल्याचा आरोप केला. तसंच त्यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी भाजप नेत्यांचं एक शिष्टमंडळ कोलकात्यात निवडणुक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचंही सांगण्यात आलं."गाडीजवळ असताना चार पाच लोकांनी मला धक्का दिला. माझ्या पायाला दुखापत झाली असून पायाला सूजही आली आहे. पायाला खुप दुखापत झाली आहे. मला तापही आला आहे. त्या ठिकाणी कोणतेही पोलीस उपस्थित नव्हते. चार पाच लोकांनी हे जाणूनबुजून केलं आहे. हे एक षडयंत्र आहे," असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. "आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर झालले्या हल्ल्याची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी करणार आहोत. ममता बॅनर्जींवर हल्ला कसा झाला, कोणत्या परिस्थितीत झाला आणि कोणी केला याची माहिती मिळणं आवश्यक आहे," असं मत पश्चिम बंगाल भाजपचे उपाध्यक्ष प्रताप बॅनर्जी यांनी एनडीटीव्हीशी बोलताना दिली. "मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा उपस्थिती असून हा हल्ला कसा झाला याचा तपास झाला पाहिजे. ज्यांच्याकडे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी होती त्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करावं याची मागणीही आम्ही करणार आहोत," असंही ते म्हणाले.
West Bengal Election : "हल्ल्याबाबत ममता बॅनर्जी खोटं पसरवतायत"; भाजप करणार निवडणूक आयोगाकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 2:02 PM
West Bengal Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांच्या पायाचा एक्स-रे काढण्यात आला असून त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने प्लास्टर घालण्यात आल्याचं एसएसकेएम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.
ठळक मुद्देबुधवारी ममता बॅनर्जींच्या पायाला झाली होती दुखापतत्यांच्या रुग्णालयात करण्यात आलं आहे दाखल