पंतप्रधान मोदींच्या उद्या बंगालमध्ये होणाऱ्या सर्व सभा रद्द, कोरोनावरील हायलेवल बैठकीत होणार सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 07:55 PM2021-04-22T19:55:25+5:302021-04-22T19:57:45+5:30
PM Modi Cancel Bengal Visit : मोदी 23 एप्रिलला बंगालमध्ये चार कार्यक्रमांना संबोधित करणार होते. मालदा, मुर्शिदाबाद, बीरभूम आणि कोलकाता (दक्षिण) येथे त्यांच्या सभा होणार होत्या.
नवी दिल्ली - संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला असतानाच पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आपल्या सर्व सभा रद्द केल्या आहेत. ते उद्या बंगालमध्ये निवडणूक प्रचार सभा करण्याऐवजी देशातील कोरोना परिस्थितीवर बैठक घेणार आहेत. ते शुक्रवारी कोरोनासंदर्भातील एका हायलेवल बैठकीत सहभागी होतील, असे त्यांनी स्वतः ट्विट करून सांगितले आहे. मात्र, बंगाल भाजपच्या विनंतीवरून मोदी सायंकाळी 5 वाजता व्हर्च्यूअली सभांना संबोधित करणार आहेत. (West Bengal election PM Narendra Modi canceled all rallies in bengal tomorrow will hold meeting on covid19 situation)
पंतप्रधान मोदी 23 एप्रिलला सकाळी 9 वाजता कोरोना संबंधित स्थितीची समीक्षा करतील. यानंतर सकाळी 10 वाजता, ते कोरोनाने सर्वाधिक प्रभावित असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक करतील. यानंतर दुपारी 12:30 वाजता, ते व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगच्या माध्यमाने देशातील मोठ्या ऑक्सीजन निर्मात्यांसोबत बैठक करतील.
मोदी 23 एप्रिलला बंगालमध्ये चार कार्यक्रमांना संबोधित करणार होते. मालदा, मुर्शिदाबाद, बीरभूम आणि कोलकाता (दक्षिण) येथे त्यांच्या सभा होणार होत्या. बंगाल भाजपने या सभांची तयारीही पूर्ण केली होती. मात्र, आता मोदींचे हे कार्यक्रम रद्द झाले आहेत. यासंदर्भात मोदींनी स्वतःच ट्विट करत माहिती दिली आहे.
Tomorrow, will be chairing high-level meetings to review the prevailing COVID-19 situation. Due to that, I would not be going to West Bengal.
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2021
या फोटोतून आपण पाहू शकता, की कोलकात्यातील शहीद मिनार मैदानात पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी कशा पद्धतीने व्यवस्था सुरू होती. टेंट, खुर्च्या, झेंडे-बॅनर लागलेले आहेत. मालदामध्येही अशीच तयारी दिसून आली. मात्र, आता पंतप्रधानांचा दौरा रद्द झाला आहे.
बंगालमध्ये आता पंतप्रधान मोदींच्या मोठ्या सभा होणार नाहीत -
तत्पूर्वी, कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, बंगालमध्ये आता पंतप्रधान मोदींच्या मोठ्या सभा होणार नाहीत. तसेच मोदी काही छोट्या सभा करतील. या सभांना 500च्या वर लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी नसेल, असा निर्णय भाजपने घेतला होता. याशिवाय, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही पंतप्रधान मोदींसह सर्व नेत्यांच्या बंगालमध्ये छोट्याच सभा केल्या जातील, असा निर्णय घेतला होता.