शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

West Bengal Election Results 2019 : पश्चिम बंगालमध्ये भाजपा ममतांचा गड पोखरणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 14:09 IST

ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल. भाजपानं पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय मिळवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली होती.

कोलकाताः ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल. भाजपानं पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय मिळवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली होती. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी-शाह यांना आव्हान दिलं होतं. पश्चिम बंगालमध्ये मोदी 24 जागांवर विजय मिळवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर तृणमूल काँग्रेसला यंदा 22 जागांवरच समाधान मानावं लागू शकतं. तर काँग्रेसला एका जागेवर आघाडी मिळाली आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते बाबूल सुप्रियो यांनी आसनसोल आणि एस. एस. अहलुवालिया बर्दवान-दुर्गापूर जागावरून मजबूत आघाडी घेतली आहे.बाबूल सुप्रियो यांनी तृणमूलचे प्रतिस्पर्धी उमेदवार मुनमुन यांच्यावर 50 हजारांची आघाडी घेतली आहे. लोकसभा निवडणूक 2019 यंदा पश्चिम बंगालमधल्या हिंसाचारामुळे चर्चेत राहिली आहे. भाजपाचं पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या गडाला सुरुंग लावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. मोदी-शाहांच्या या प्रयत्नाला काही प्रमाणात यश मिळतानाही पाहायला मिळतंय. ममता बॅनर्जी ट्विट करत म्हणाल्या, ममतांनी विजयी उमेदवारांचं अभिनंदनही केलं आहे. पण पराभव झालेले सगळेच हरलेले नाहीत. आम्ही सर्वच गोष्टींचा आढावा घेणार असून, नंतरच प्रतिक्रिया देऊ, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी एक्झिट पोलवरून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.'एक्झिट पोलवर माझा विश्वास नाही, कारण अशा रणनीतीचा वापर फक्त ईव्हीएममध्ये घोटाळा करण्यासाठी केला जातो', असे ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवरून म्हटले होते. यावरून ममता बॅनर्जी ट्विटरवर म्हणाल्या, 'मी एक्झिट पोलवर विश्वास ठेवत नाही. अशा प्रकारची रणनिती हजारो ईव्हिएममध्ये फेरफार करण्यासाठी वापरली जाते. मी सर्व विरोधी पक्षांना एकजूट, मजबूत आणि धाडसी राहण्यासाठी आवाहन करत आहे. आम्ही ही लढाई एकत्र लढवू, असंही त्या म्हणाल्या आहेत.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९