West Bengal Election Voting : पंतप्रधान मोदींनी आचार संहितेचं उल्लंघन केलं, ममतांचा आरोप; म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 04:42 PM2021-03-27T16:42:18+5:302021-03-27T16:42:27+5:30

पश्चिम बंगालमध्ये मतुआ समाजाची संख्या जवळपास 2 कोटी एवढी आहे. हा समाज पश्चिम बंगालमधील मतांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.

West Bengal Election Voting Mamata Banerjee says elections are underway here and PM goes to bangladesh and lectures on bengal | West Bengal Election Voting : पंतप्रधान मोदींनी आचार संहितेचं उल्लंघन केलं, ममतांचा आरोप; म्हणाल्या...

West Bengal Election Voting : पंतप्रधान मोदींनी आचार संहितेचं उल्लंघन केलं, ममतांचा आरोप; म्हणाल्या...

Next

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी नेत्या ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. ममता म्हणाल्या, राज्यात निवडणूक होत आहे आणि ते (पंतप्रधान मोदी) बांगलादेशात जाऊन बंगालवर व्याख्यान देत आहेत. हे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघण आहे. ममता खडगपूर येथे एका सभेला संबोधित करत होत्या.  (West Bengal Election Voting Mamata Banerjee says elections are underway here and PM Narendra Modi goes to bangladesh and lectures on bengal)

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेश दौऱ्यावर आहेत. त्यांनी शनिवारी येथील ओरकांडी येथे जाऊन मतुआ समाजाच्या प्रतिनिधींची भेट घेतली. यापूर्वी त्यांनी मतुआ समाजाच्या मंदिरात जाऊन दर्शण घेतले आणि नंतर समुदायाच्या लोकांना संबोधित केले.

मलाही अगदी 'तसेच' वाटते आहे - मोदी
मतुआ समुदायाला संबोधित करताना मोदी म्हणाले, श्री श्री हरिशचंद्र ठाकूर यांच्या कृपेनेच मला ओराकान्डी ठाकूरबाडी, या पुण्यभूमीचे दर्शन करण्याचे भाग्य लाभले. मी श्री श्री हरिशचंद्र ठाकूर जी आणि श्री श्री गुरुचंद ठाकूर जी यांच्या चरणांत नतमस्कत होऊन त्यांना नमन करतो. एका व्यक्तीशी केलेल्या चर्चेचा हवाला देत मेदी म्हणाले, कुणी विचार तरी केला होता का, की एखादा भारतीय पंतप्रधान येथे येईल आणि मतुआ समाजाच्या मंदिरात पूजा करेल. भारतात राहणाऱ्या माझ्या मतुआ समाजाच्या भाऊ आणि बहिणींना ओराकांडी येथे आल्यानंतर जसे वाटते, मलाही अगदी तसेच वाटत आहे.

मोदी म्हणाले, मला आठवते, की मी पश्चिम बंगालमध्ये ठाकुरनगरमध्ये गेलो होतो. तेथील माझ्या मतुआ भाऊ-बहिणींनी मला कुटुंबातील सदस्याप्रमाणेच प्रेम दिले होते. विशेषतः ‘बॉरो-मां’चा आपलेपणा, आई प्रमाणेच त्यांचा आशीर्वाद, माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचे क्षण आहेत.

म्हणून मतुआ समाज महत्वाचा - 
पश्चिम बंगालमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत असतानाच पंतप्रधान मोदींनी मतुआ समाजाच्या मंदिरात पूजा केली. पश्चिम बंगालमध्ये मतुआ समाजाची संख्या जवळपास 2 कोटी एवढी आहे. हा समाज पश्चिम बंगालमधील मतांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.

जेशोरेश्वरी काली मंदिरात जाऊन दर्शन - 
आज पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ईश्वरीपूर गावातील प्राचीन जेशोरेश्वरी काली मंदिरात जाऊनही दर्शन घेतले आणि पूजा केली. मोदींच्या बांगलादेशातील या मंदिर भेटींकडे राजकीय दृष्टीनेही पाहिले जात आहे.
 

Web Title: West Bengal Election Voting Mamata Banerjee says elections are underway here and PM goes to bangladesh and lectures on bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.