पायलान (पश्विम बंगाल) -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी ‘दीदी-भतीजा’ मुद्द्यावरून केंद्रीय गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) यांना आव्हान दिले आहे. अमित शाह यांनी सर्वप्रथम त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जीविरोधात निवडणूक लढवून दाखवावी आणि मग माझा सामना करावा, असे ममतांनी म्हटले आहे. त्या दक्षिण 24 परगना जिल्ह्यातील पायलान येथे रॅलीला संबोधित करत होत्या. (First fight Abhishek then me Mamata challenges Amit Shah)
ममता म्हणाल्या, अभिषेक यांना राज्यसभेचे सदस्य होऊन सोप्या मार्गाने खासदार होता आले असते. मात्र, त्यांनी लोकसभा निवडणूक लढली आणि जनादेश मिळवला. ‘ते दिवस-रात्र दीदी-भतीजा म्हणून बोलत आहेत. मी अमित शाह यांना आव्हान देते, की त्यांनी आधी अभिषेक बॅनर्जीविरोधात निवडणूक लढावी आणि नंतर माझा सामना करावा.’ शाह यांच्यासह भाजप नेते बॅनर्जींवर सातत्याने वंशवादाच्या राजकारणाचा आरोप करत आहेत. तसेच भाच्याला विशेष प्राधान्य मिळते. तसेच त्यांनाच अखेर राज्याचे मुख्यमंत्री बनविले जाईल, असेही म्हटले जात आहे.
शरणार्थींच्या घरी भोजन अन् ममतांवर निशाणा; असा सुरू आहे अमित शाहंचा धडाकेबाज बंगाल दौरा, पाहा PHOTO
यावेळी ममतांनी शाह यांच्यावर थेट हल्ला चढवला. ‘आपला मुलगा क्रिकेट प्रशासनाचा भाग कसा झाला आणि त्याने कोट्यवधी रुपये कसे कमावले?’ असा सवाल करत, आपला पक्ष राज्यात मागील सर्व निवडमुकांचे रेकॉर्ड तोडेल आणि सर्वाधिक मते मिळवत येणाऱ्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकेल, असा दावा ममतांनी यावेळी केला.
निवडणुकीच्या काही महिने आधीपासूनच भाजप सक्रीय -पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या काही महिने आधीपासूनच भाजप बंगालमध्ये सक्रिय झाला आहे. गृहमंत्री शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, हे बंगालमध्ये सातत्याने दौरे करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर देवी पूजेसह अनेक मुद्द्यांवर निशाणा साधला. शाह यांनी कोलकात्याजवळील दक्षीण 24 परगना जिल्ह्यात रॅली केली.
बंगाल : ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मंत्र्यावर हल्ला हा कट, रेल्वे जबाबदारी झटकू शकत नाही"
पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि तृणमूल काँग्रेसचा जबरदस्त प्रचार सुरू आहे. तृणमूलच्या प्रचार मोहिमेचे नेतृत्व मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडे आहे. तर भाजपचे वरिष्ठ नेते बंगाल निवडणुकीच्या आखाड्यात मैदानात उतरले आहेत.