शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

कोलकाता बलात्कार प्रकरण : सौरव गांगुलीनं चूक सुधारली, टीकेनंतर डीपी केला 'ब्लॅक', म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 12:30 PM

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही याविरोधात आवाज उठवला आहे. त्यानेही न्यायाची मागणी करणाऱ्या हजारो लोकांसोबत एकजूटता दाखवत आपला सोशल मीडिया प्रोफाइल पिक्चरही 'ब्लॅक' केला आहे. रुग्णालयातील या घटनेविरोधात आता अशा प्रकारे एक ऑनलाइन मोहीमही सुरू झाली आहे.

कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील, प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर संपूर्ण देशातून संताप व्यक्त केला जात आहे. यातच आता, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही याविरोधात आवाज उठवला आहे. त्यानेही न्यायाची मागणी करणाऱ्या हजारो लोकांसोबत एकजूटता दाखवत आपला सोशल मीडिया प्रोफाइल पिक्चरही 'ब्लॅक' केला आहे. रुग्णालयातील या घटनेविरोधात आता अशा प्रकारे एक ऑनलाइन मोहीमही सुरू झाली आहे.

सौरव गांगुलीने कोलकात्याच्या सुरक्षिततेसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर झालेल्या टीकेनंतर सौरव गांगुलीने आपला डीपी ब्लॅक केला आहे. त्याने केलेल्या वक्तव्यानंतर, त्याच्यावर गुन्ह्याचे गांभीर्य कमी केल्याचा आरोप झाला होता. यानंतर रविवारी स्पष्टीकरण देत आपले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने घेण्यात आल्याचे गांगुलीने म्हटले होते. तसेच, एका मुलीचा पिता म्हणूनही त्याने या घटनेवर चिंताही व्यक्त केली.

गांगुलीनही केली कठोर शिक्षेची मागणी -गांगुली म्हणाला, "गेल्या रविवारी मी काय बोललो होतो आणि ते कशा पद्धतीने सादर केले गेले, मला माहीत नाही. ही एक अत्यंत भयंकर घटना आहे, हे मी आधीही म्हटले आहे. आता सीबीआय आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जे घडले, ते अत्यंत लज्जास्पद आहे. मला आशा आहे की, गुन्हेगाराला शोधल्यानंतर सीबीआय कठोरात कठोर शिक्षा देईल. शिक्षा अशी असावी की, आयुष्यात पुन्हा असा गुन्हा करण्याची कुणाची हिंमत होणार नाही. हे महत्त्वाचे आहे. शिक्षा कठोर असावी"

काय म्हणाला होता गांगुली? -11 ऑगस्टला कोलकात्यात एका कार्यक्रमात बोलताना गांगुली म्हणाला होता, "घटना अत्यंत दुर्दैवी आणि भीतीदायक आहे. कठोरात कठोर करावाई करण्यात यावी. सर्व काही कुठेही शक्य आहे. यामुळे सीसीटीव्हीच्या सहाय्याने सुरक्षा व्यवस्था करायला हवी. अशी घटना कुठेही होऊ शकते. कठोर करवाई करण्यात यावी."

या वक्तव्यामुळे झाली होती टीका -एक व्हायरल व्हिडिओमध्ये गांगुली पुढे म्हणाला, "मला असे वाटत नाही की, एखाद्या घटनेवरून सर्वकाही अंदाज बांधावा. यामुळे सर्व काही अथवा कुणीही सुरक्षित नाही, असा विचार करणे चुकीचे आहे. अशा घटने संपूर्ण जगात होत असतात. यामुळे मुली सुरक्षित नाहीत, असा विचार करणे चूक आहे. केवळ पश्चिम बंगालच नाही, तर संपूर्ण देशात महिला सुरक्षित आहेत. एका घटनेवरून कुणाबद्दल मत बनवू नये."  

टॅग्स :Saurav Gangulyसौरभ गांगुलीwest bengalपश्चिम बंगालdoctorडॉक्टरSexual abuseलैंगिक शोषणDeathमृत्यू