West Bengal Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसला एकापाठोपाठ एक झटके बसत आहेत. पश्चिम बंगाल काँग्रेसमध्ये मोठी राजकीय घडामोडी घडली आहे. काँग्रेसने राज्याचे सरचिटणीस बिनॉय तमांग यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. तमांग यांनी काँग्रेसऐवजी भाजप उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केल्यामुळे पक्षाने ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, दार्जिलिंग मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार मुनीश तमांग यांच्या नावावर बिनॉय तमांग यांनी आक्षेप घेतला होता. पक्षाच्या हायकमांडने उमेदवारासाठी सल्लामसलत केली नसल्याचे ते म्हणाले होते. यानंतर त्यांनी भाजप उमेदवार राजू बिस्ता यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. यानंतर पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
व्हिडिओ संदेशात भाजपला पाठिंबा दिलामतदानाच्या अवघ्या 72 तासांपूर्वी बिनॉय तमांग यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले की, दार्जिलिंगमधील गोरखांना न्याय मिळावा, यासाठी मी भाजप उमेदवार राजू बिस्ता यांना पाठिंबा देत आहे. केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार येणार आहे, 2026 च्या विधानसभा निवडणुकीतदेखील पश्चिम बंगालम भाजपचे सरकार सत्तेवर येण्याची शक्यता आहे, त्यामुळे 26 एप्रिल रोजी राजू बिस्ता यांना मतदान करा.
पाच महिन्यांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केलाएकेकाळी गोरखा जनमुक्ती मोर्चाचे नेते आणि बिमल गुरुंगचे अनुयायी असलेले बिनॉय तमांग 2021 मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले होते. 2022 मध्ये त्यांनी तृणमूलची साथ सोडली आणि नोव्हेंबर 2023 मध्ये काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांच्याच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये दाखल झाले. आता अवघ्या 5 महिन्यांनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.