मुस्लीम मतदारांच्या हाती या मतदारसंघाची चावी; तृणमूल काँग्रेसला माकप देणार टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 06:01 IST2024-04-26T06:01:31+5:302024-04-26T06:01:52+5:30
२०१९ मध्ये येथून तृणमूल कॉंग्रेसचे अबू ताहेर खान हे विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत तृणमूलने परत त्यांच्यावरच विश्वास टाकला आहे

मुस्लीम मतदारांच्या हाती या मतदारसंघाची चावी; तृणमूल काँग्रेसला माकप देणार टक्कर
योगेश पांडे
मुर्शिदाबाद (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद मतदारसंघ हा सर्वात मोठा ‘हॉटसीट’ मानला जात आहे. निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराचा इतिहास, काही दिवसांअगोदर रामनवमीदरम्यान झालेली हिंसा, यामुळे सुरक्षायंत्रणांची येथे मोठी परीक्षा राहणार आहे. मुस्लीम मतदारांची संख्या येथे ६६ टक्क्यांहून अधिक असून, हेच मतदार येथील उमेदवारांचे भाग्य निश्चित करणार आहेत.
२०१९ मध्ये येथून तृणमूल कॉंग्रेसचे अबू ताहेर खान हे विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत तृणमूलने परत त्यांच्यावरच विश्वास टाकला आहे, तर भाजपने गौरी शंकर घोष यांना तिकीट दिले आहे. माकचे प्रदेश सचिव मोहम्मद सलीम हे उभे आहेत. सलीम यांच्या उमेदवारीमुळे तृणमूलला मोठी टक्कर मिळण्याची शक्यता आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
- २००३ सालापासून बहुतांश निवडणुकांमध्ये हिंसाचार पाहायला मिळाला आहे. बांगलादेशला लागून हा मतदारसंघ असल्याने घुसखोरीचा मुद्दा नेहमीच ऐरणीवर असतो.
- भाजप व सीपीआयकडून बेरोजगारी व विकासाच्या अभावाच्या मुद्द्यांवर प्रचार सुरू आहे. दुसरीकडे तृणमूलतर्फे सीएएचा मुद्दा समोर करून मुस्लीम मतदारांमध्ये प्रचारावर भर देण्यात येत आहे.
अशी होती २०१९ ची स्थिती
अबू ताहेर खान
तृ. कॉंग्रेस (विजयी)
६,०४,३४६
अबू हेना
(कॉंग्रेस)
३,७७,९२९