काँग्रेसला धक्का! TMC ने जाहीर केले 42 उमेदवार; क्रिकेटर युसूफ पठाणला तिकीट, पाहा यादी...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 02:55 PM2024-03-10T14:55:04+5:302024-03-10T14:56:18+5:30

इंडिया आघाडीत मोठी फूट पडली आहे. तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये आपल्या सर्व उमेदवारांची घोषणा केली.

West Bengal Loksabha Election 2024 : Shock to Congress! TMC announces 42 candidates; Tickets for cricketer Yusuf Pathan, see full list | काँग्रेसला धक्का! TMC ने जाहीर केले 42 उमेदवार; क्रिकेटर युसूफ पठाणला तिकीट, पाहा यादी...

काँग्रेसला धक्का! TMC ने जाहीर केले 42 उमेदवार; क्रिकेटर युसूफ पठाणला तिकीट, पाहा यादी...

West Bengal Loksabha Election 2024 : सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येत INDIA आघाडीची स्थापना केली. पण, आता या आघाडीत जागावाटपावरुन मोठी फूट पडली आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनी राज्यातील 42 लोकसभा मतदारसंघांसाठी पक्षाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. 

टीएमसीने क्रिकेटपटू युसूफ पठाणला बेरहामपूर मतदारसंघातून तिकीट दिले, असून त्यांचा सामना काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांच्याशी होणार आहे. महुआ मोईत्रा कृष्णनगरमधून निवडणूक लढवतील. विद्यमान खासदार आणि ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा पुन्हा एकदा आसनसोलमधून निवडणूक लढवणार आहेत.

याशिवाय माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद हे बर्दवान दुर्गापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. गेल्या निवडणुकीत ही जागा भाजपच्या अहलुवालिया यांनी जिंकली होती. विद्यमान खासदार नुसरत जहाँचे तिकीट कापले असून, हाजी नुरुल इस्लाम बशीतरहाट मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर, जगदीश चंद्र बर्मा बसुनिया कूचबिहारमधून निवडणूक लढवतील. पक्षाच्या युवक काँग्रेस अध्यक्षा सयानी घोष जाधवपूरमधून निवडणूक लढवणार आहेत.

काँग्रेसची प्रतिक्रिया
तृणमूल काँग्रेसने राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आणि आज थेट उमेदवारही घोषित केले. यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले, काँग्रेसने अनेकदा पश्चिम बंगालमध्ये टीएमसीसोबत जागावाटपाची इच्छा व्यक्त केली होती. दोन्ही पक्षांनी मिळून जागावाटपाबाबत निर्णय घ्यावा आण इंडिया आघाडीने एकत्र येऊन भाजपशी लढावे, अशी आमची इच्छा होती,' अशी प्रतिक्रिया रमेश यांनी दिली.

पाहा टीएमसी उमेदवारांची यादी...

  1. कूचबिहार-जगदीश बसुनिया
  2. अलीपुरद्वार- प्रकाश चिक बडाइक
  3. जलपाईगुडी-निर्मलचंद्र रॉय
  4. दार्जिलिंग- गोपाल लामा
  5. रायगंज- कृष्णा कल्याणी
  6. बालूरघाट- बिप्लब मित्र
  7. मालदा उत्तर- प्रसून बॅनर्जी
  8. मालदा दक्षिण - शाहनवाज अली रहमान
  9. जंगीपूर- खलीलुर रहमान
  10. बहरामपूर- युसूफ पठाण
  11. मुर्शिदाबाद – अबू ताहिर खान
  12. कृष्णनगर- महुआ मोईत्रा
  13. राणाघाट- मुकुट घातलेला
  14. बनगाव- विश्वजित दास
  15. बॅरकपूर-पार्थ भौमिक
  16. दम दम - सौगता रॉय
  17. बारासात- काकली घोष दस्तीदार
  18. बशीरहाट- हाजी नुरुल इस्लाम
  19. जयनगर- प्रतिमा मंडळ
  20. मथुरापूर- बापी हलदर
  21. डायमंड हार्बर- अभिषेक बॅनर्जी
  22. जाधवपूर- सयानी घोष
  23. कोलकाता दक्षिण- माला रॉय
  24. कोलकाता उत्तर- सुदीप बॅनर्जी
  25. हावडा- प्रसून बॅनर्जी
  26. उलुबेरिया- सजदा अहमद
  27. श्रीरामपूर- कल्याण बॅनर्जी
  28. हुगळी- रचना बॅनर्जी
  29. आरामबाग- मिताली बाग
  30. तमलूक- देवांशू भट्टाचार्य
  31. कंठी - छान बारीक
  32. घाटाळ-देव
  33. झारग्राम- कालीपद सोरेन
  34. मेदिनीपूर - जून मलिया
  35. पुरुलिया- शांतीराम महत
  36. बांकुरा- अरुप चक्रवर्ती
  37. बर्दवान पूर्व – डॉ. शर्मिला सरकार
  38. बर्दवान दुर्गापूर - कीर्ती आझाद
  39. आसनसोल- शत्रुघ्न सिन्हा
  40. बोलपूर – असित मल
  41. बीरभूम- शताब्दी रॉय
  42. विष्णुपूर- सुजाता मंडल खान

Web Title: West Bengal Loksabha Election 2024 : Shock to Congress! TMC announces 42 candidates; Tickets for cricketer Yusuf Pathan, see full list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.