शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

ममता बॅनर्जी सुरू करणार 'मां की रसोई'; ५ रूपयांत मिळणार पोटभर जेवण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 9:21 PM

यापूर्वी दिल्लीत गौतम गंभीरनं स्वत:च्या फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू केली होती 'जन रसोई'

ठळक मुद्देगरीबांना ५ रूपयांत मिळणार पोटभर जेवणगौतम गंभीरनंही दिल्लीत केली होती जन रसोईची सुरूवात

पुढील काही महिन्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसण्यास सुरूवात केली आहे. प्रत्येक पक्ष मतदारांना काही ना काही आश्वासनं देण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच पश्चिम बंगालमध्येममता बॅनर्जी सरकार 'मां की रसोई' ही योजना सुरू करणार आहे. काही दिवसांपूर्वी गौतम गंभीर यानंदेखील दिल्लीत जन रसोईची सुरूवात केली होती. या ठिकाणी त्यानं आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून गरीबांसाठी एका रुपायात जेवण उपलब्ध करून दिलं आहे.निवडणुकांपूर्वी ममता बॅनर्जी यांचं सरकार 'मां की रसोई' हे योजना घेऊन येत आहे. या योजनेअंतर्गत गरीबांना केवळ पाच रुपयांमध्ये पोटभर जेवण मिळणार आहे. यामध्ये ग्राहकांना डाळ, भात, एक भाजी आणि अंड देण्यात येणार आहे. सोमवारी १५ फेब्रुवारी रोजी या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. राज्य सचिवालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ममता बॅनर्जी या योजनेचं उद्घाटन करतील. या योजनेअंतर्गत सध्या कोलकात्यातील १६ बोरो कार्यालयात दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली जाईल. या योजनेअंतर्गत प्रत्येक ठिकाणी जवळपास एक हजार लोकांना दुपारचं जेवण देण्यात येणार आहे. हळूहळू कोलकात्याच्या बाहेरही या योजना सुरू करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. गौतम गंभीरनंही दिल्लीत केली होती सुरूवातगेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गौतम गंभीर यांनी आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून दिल्लीतील गांधीनगर येथे जन रसोईची सुरूवात केली होती. याअंतर्गत लोकांना केवळ एका रूपयात भोजनाचा आस्वाद घेता येतो. कोरोना महासाथीच्या दरम्यान सुरू करण्यात आलेल्या या जन रसोईमध्ये सर्व नियमांचं पालनही केलं जातं. तसंच जेवण तयार करण्यापूर्वी संपूर्ण जागाही सॅनिटाईझ करण्यात येते. पहिल्यांदा सुरू करण्यात  आलेल्या जन रसोईमध्ये २५ जानेवारी २०२१ पर्यंत एका रूपयात जवळपास ३० हजार लोकांनी भोजनाचा आस्वाद घेतला होता. गौतम गंभीर फाऊंडेशन 'फुड फॉर ऑल' या अंतर्गत दिल्लीत एका रूपयात जेवण उपलब्ध करून देत आहे. १० फेब्रुवारी रोजी दिल्लीत आणखी एका ठिकाणी जन रसोईची सुरूवात करण्यात आली होती. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकfoodअन्नChief Ministerमुख्यमंत्री