पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळालं. यावेळी प्रचारादरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या 'खेला होबे' या वाक्यानं माहोल तयार केला होता. परंतु आता तृणमूल काँग्रेस सरकारनं या वाक्याला एका योजनेचं रुप दिलं आहे. पश्चिम बंगालमध्ये खेला होबे ही स्कीम लाँच करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्य सरकारच्या क्रीडा विभागाद्वारे फुटबॉल क्लब्सना फुटबॉल्सचं वाटप केलं जाईल.तरूण वर्गात खेळाप्रती उत्साह वाढवण्याच्या दृष्टीनं तसंच फुटबॉलमध्ये सहभाग वाढवण्यासाठी सरकारद्वारे खेला होबे स्कीम अंतर्गत फुटबॉल वाटले जाणार आहेत. तसंच मोठ्या प्रमाणात तरूण वर्ग हा खेळ खेळू शकेल असंही यावेळी सांगण्यात आलं. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ही स्कीरम सुरू केली जाणार आहे. तसंच फुटबॉल वाटपासही सुरूवात करण्यात येणार असल्याचं क्रीडा विभागाकडून सांगण्यात आलं.कोणत्या क्लबला किती फुटबॉलचं वाटप केलं जाईल आणि कसं केलं जाईल याची माहिती लवकरच दिली जाणार असल्याचंही क्रीडा विभागानं सांगितलं. पश्चिम बंगाल सरकारच्या क्रीडा मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या सूचनांनुसार प्रत्येक जिल्ह्याच्या युथ ऑफिसरना निर्देश देण्यात आले असून कोणत्या जिल्ह्यात किती क्लब आहेत याची यादी तयार करण्यास सांगितलं आहे. ही यादी क्रीडा विभागाला पाठवली जाणार असून यासाठी अंतिम तारीख २८ जून ही आहे.
West Bengal : निवडणुका संपल्यानंतरही ममता बॅनर्जी यांची नवी 'खेळी'; 'खेला होबे' स्कीम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 16:48 IST
West Bengal Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आली खेला होबे स्कीम. विधानसभेत तृणमूल काँग्रेसकडून करम्यात आला होता या वाक्याचा वापर.
West Bengal : निवडणुका संपल्यानंतरही ममता बॅनर्जी यांची नवी 'खेळी'; 'खेला होबे' स्कीम सुरू
ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आली खेला होबे स्कीम. विधानसभेत तृणमूल काँग्रेसकडून करम्यात आला होता या वाक्याचा वापर.