कोलकाता: पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील दत्तपुकुर शहरात रविवारी एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या घटनेत किमान 7 जण ठार आणि अनेक जण जखमी झाले. स्फोटाची माहिती मिळताच बचावकार्य सुरू झाले आणि जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, नीलगंज भागातील एका अवैध कारखान्यात रविवारी सकाळी हा स्फोट झाला. या घरामागे बेकायदेशीरपणे फटाके बनवले जात असल्याचे स्थानिक नागरिकांनी पोलिसांना सांगितले. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून ढिगाऱ्याखाली आणखी लोकांचे मृतदेह सापडण्याची भीती पोलिसांना आहे. स्फोटाच्या वेळी शेजारी उभ्या असलेल्या लोकांचे तुकडे तुकडे झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
मृतदेह उडून झाडावर लटकलास्फोट झाला तेव्हा दृश्य इतके भयानक होते की, स्फोटामुळे मृतदेहाचे तुकडे उडून आजुबाजूला पडले. एका व्यक्तीचा मृतदेह पेरुच्या झाडाला एक लटकला. यावरुन स्फोटाची भीषणता लक्षात येईल. बेकायदा फटाक्यांच्या कारखान्याची माहिती पोलिसांना आधीच देण्यात आली होती, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
मृतदेह ओळखणे कठीणस्थानिक लोकांनी पोलिसांना सांगितले की, ज्या घरामध्ये स्फोट झाला त्या घराचा मालक अवैध कारखान्यात काम करण्यासाठी बाहेरून लोकांना आणतो. त्यामुळे या अपघातात कोणाचा मृत्यू झाला आहे, हे ओळखणे कठीण होणार आहे. याआधीही बेकायदा बॉम्ब बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये असे स्फोट आणि जाळपोळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत. असे असतानाही प्रशासन किंवा पोलिसांकडून कडक कारवाई होत नाही.
भाजपची टीकाया घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले की, "केवळ या कारखान्यातच नाही, तर संपूर्ण राज्यात असे वातावरण आहे. मुख्यमंत्री (ममता बॅनर्जी) म्हणाल्या होत्या की, हे बेकायदेशीर कारखाने बंद केले जातील, परंतु त्या चोरांना संरक्षण देण्यात व्यस्त आहेत. त्यांचे काम राज्यातील इमामांच्या बैठका घेणे आणि जातीय कार्ड खेळणे आहे."