शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

बंगालची रक्तरंजित निवडणूक! घोषणा झाल्यापासून एका महिन्यात 40 जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 3:20 PM

West Bengal Panchayat Election Violence: पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आणि हिंसाचार एक समीकरण बनले आहे.

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आणि हिंसाचार हे समीकरण बनले आहे. निवडणुकीचे बिगूल वाजल्यापासून राज्यात हिंसाचार सुरू होतो. 2023 सालच्या पंचायत निवडणुकीतही असेच जाले आहे. 5 जून रोजी पंचायत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज जाहीर होताच राज्यात रक्तरंजित खेळ सुरू झाला. निवडणुकीच्या प्रचारापासून ते मतदानाच्या दिवसापर्यंत हिंसाचार, बॉम्बस्फोट आणि रक्तपात सुरूच होता. गेल्या 30 दिवसांत निवडणूक हिंसाचारात 40 जणांचा मृत्यू झाला आहे.

पंचायत निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. मतदानाच्या रात्रीपासूनच हिंसाचार सुरू झाला आणि सकाळी सात वाजल्यापासूनच हिंसाचारासह मतदानाला सुरुवात झाली. मतदानाच्या दिवशीच 20 जणांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या 40 च्या आसपास पोहोचली आहे. म्हणजेच 30 दिवसांत एकूण 40 जणांचा मृत्यू झाला आहे. निवडणुकीतील हिंसाचारामुळे सोमवारी राज्यातील 697 बूथवर फेरमतदान होत आहे. आजही हिंसाचाराच्या घटना सुरुच आहेत. 

बंगालमध्ये हिंसाचार परंपरा बनली बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान हिंसाचार होण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे नाही. ममता बॅनर्जी यांच्या राजवटीच्या आधी राज्यात डाव्या पक्षांची सत्ता होती. ज्योती बसू आणि बुद्धदेव भट्टाचार्य हे मुख्यमंत्री होते. डाव्या राजवटीतही हिंसाचार सुरू होता. 2003 मध्ये डाव्या राजवटीत झालेल्या हिंसाचारात 70 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. 2008 मध्ये निवडणूक हिंसाचारात 36 जणांचा मृत्यू झाला होता.

ममता बॅनर्जी यांनी 2011 मध्ये सत्ता हाती घेतली. 2013 मध्ये पहिल्यांदा पंचायत निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत 39 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. राज्यात दोन वर्षांपूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या. निवडणुकीतील हिंसाचारात 10 जणांचा मृत्यू झाला होता. निवडणुकीनंतर त्यांच्या 40 कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही सीबीआय विधानसभा निवडणुकीतील हिंसाचाराचा तपास करत आहे.

सर्वाधिक हत्या मुर्शिदाबादमध्ये झाल्या हिंसाचाराची सुरुवात पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातून झाली. मुर्शिदाबादमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मुर्शिदाबाद जिल्हा मुस्लिमबहुल मानला जातो आणि येथे काँग्रेस नेते अधीर चौधरी यांचा प्रभाव आहे. या जिल्ह्यात सर्वाधिक संघर्षाच्या घटना काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस समर्थकांमध्ये घडल्या आहेत. रक्तरंजित संघर्ष केवळ काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्येच झाला आहे, असे नाही. तृणमूल काँग्रेसच्याच पक्षाच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. या हिंसाचारात भाजप, सीपीआय (एम) आणि आयएसएफच्या कार्यकर्त्यांचाही मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकtmcठाणे महापालिकाBJPभाजपा