video: महिला उमेदवारचा पती मतपेटी घेऊन पळाला; पोलिसांनी पकडून दिला चोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 05:03 PM2023-07-11T17:03:15+5:302023-07-11T17:03:27+5:30
पश्चिम बंगालमध्ये 8 जुलै रोजी पंचायत निवडणूक पार पडली, आज(दि.11) मतमोजणी सुरू आहे.
कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये 8 जुलै रोजी झालेल्या पंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी मतमोजणी होत आहे. यादरम्यान मालदा येथील सोवनगर ग्रामपंचायत क्षेत्रातील मतमोजणी केंद्रावर अचानक मोठा गोंधळ झाला. एका महिला उमेदवाराचा पती मतपेटी घेऊन पळून गेला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
#WATCH | West Bengal panchayat election | Ruckus ensued at a counting centre in Sovanagar gram panchayat of Malda after the husband of a candidate allegedly attempted to flee from here with a ballot box. He was chased by Police and nabbed. pic.twitter.com/ngHV0MTRo6
— ANI (@ANI) July 11, 2023
एएनआय या वृत्तसंस्थेने या घटनेचा व्हिडिओ शेअर करताना सांगितले की, मतमोजणी केंद्रावर मतमोजणीदरम्यान गोंधळ सुरू होता. यावेळी अनेक स्थानिक लोक एका व्यक्तीकडे बोट दाखवताना दिसले. तो एका उमेदवाराचा पती असून मतपेटी घेऊन पळून जात होता. पोलिस लगेचच त्याच्या मागे धावले. काही अंतर पाठलाग करत त्याला पकडले आणि चांगलाच चोप दिला.
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीच्या आतापर्यंत हाती आलेल्या ट्रेंडनुसार, टीएमसीने 8232 जागा जिंकल्या आहेत आणि 2712 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजपने 1714 जागा जिंकल्या असून 734 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 362 जागा जिंकून 215 वर आघाडीवर आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या (SEC) अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली.