शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

West Bengal: प्रचारादरम्यान वादग्रस्त भाषणाप्रकरणी कोलकात्यात मिथुन चक्रवर्ती यांची पोलिसांकडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 12:41 PM

West Bengal Election : वादग्रस्त भाषण केल्यासंबंधी मिथुन चक्रवर्ती यांच्याविरोधात मानिकलता पोलीस स्थानकात दाखल आहे तक्रार. FIR रद्द करण्यासाठी मिथुन चक्रवर्तींनी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा.

ठळक मुद्देवादग्रस्त भाषण केल्यासंबंधी मिथुन चक्रवर्ती यांच्याविरोधात मानिकलता पोलीस स्थानकात दाखल आहे तक्रार. FIR रद्द करण्यासाठी मिथुन चक्रवर्तींनी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा.

West Bengal Election Mithun Chakraborty : काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुकांपूर्वी मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रचारसभेदरम्या वादग्रस्त भाषणाप्रकरणी त्यांच्याविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी मिथून चक्रवर्ती यांची चौकशी केली आहे. पोलिसांनी व्हर्च्युअल पद्धतीनं ही चौकशी केली. वादग्रस्त भाषण केल्याचं सांगत मिथून चक्रवर्ती यांच्याविरोधात मानिकलता पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर आपल्या विरोधातील एफआयआर रद्द करण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यानंतर या प्रकरणी न्यायालयानं तपास अधिकाऱ्यांना मिथुन चक्रवर्ती यांची व्हर्च्युअली चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

मार्च महिन्यात कोलकात्यात मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. "आपण एक नंबरचे कोब्रा आहोत. डसलो तर फोटो बनून जाल," असं वक्तव्य ब्रिगेड ग्राऊंडवर आयोजित सभेदरम्यान त्यांनी केलं होतं. "मी बंगाली असल्याचा मला अभिमान आहे. माझे डायलॉग तुम्हाला आवडतात याची मला कल्पना आहे," असंही ते म्हणाले होते. 

यापूर्वी मिथुन चक्रवर्ती हे तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेवरही गेले होते. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भाजपनं आपली पूर्ण ताकद लावली होती. परंतु यानंतरही ममता बॅनर्जी यांना सत्तेवरून हटवण्यात त्यांना यश आलं नाही. तृणमूल काँग्रेसनं २०० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवत तिसऱ्यांदा सत्ता आपल्या हाती ठेवली आहे.

टॅग्स :Mithun Chakrabortyमिथुन चक्रवर्तीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस