पश्चिम बंगालमध्ये शनिवारी विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. मतदानापूर्वी बांकुडा येथील तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. माध्यमांमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार या स्फोटात तृणमूल काँग्रेसचे चार कार्यकर्ते जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. या स्फोटानंतर त्या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसही त्या ठिकाणी पोहोचले आहेत.बांकुरा येथील जॉयपूर येथे शुक्रवारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर तृणमूल काँग्रेसकडून भाजपवर आरोप करण्यात आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार होत असलेला पाहून मला अतिव दु:ख झालं आहे. पश्चिम बंगाल आणि कोलकाता पोलिसांनी योग्य ती पावलं उचलावी आणि कायद्यानुसार कारवाईदेखील करावी, अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी दिली. प्रशासन आणि पोलिसांनी राजकीय तटस्थता टिकवून ठेवणं आणि कायद्याप्रती वचनबद्ध राहणं आवश्यक आहे. कायद्याचं उल्लंघन केल्यास संबंधितांना शासन केलं जाईल, असंही त्यांनी नमूद केलं.
West Bengal Election : पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी TMC च्या कार्यालयात स्फोट; कार्यकर्ते जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 8:04 PM
West Bengal Election 2021: शनिवारी पार पडणार आहे पहिल्या टप्प्यातील मतदान
ठळक मुद्देशनिवारी पार पडणार आहे पहिल्या टप्प्यातील मतदान तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.